Sonarika Bhadoria : छोट्या पडद्यावरील 'पार्वती'ला मिळाले तिचे 'शिव'; 'देवों के देव महादेव'फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात
Sonarika Bhadoria Wedding Ceremony : छोट्या पडद्यावरील'देवों के देव महादेव' मालिकेत पार्वतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनारिका भदोरिया विवाहबंधनात अडकली अडकली आहे.
Sonarika Bhadoria Wedding Ceremony : छोट्या पडद्यावरील'देवों के देव महादेव' मालिकेत पार्वतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सोनारिका भदोरिया ( Sonarika Bhadoria) विवाहबंधनात अडकली अडकली आहे. विकास पराशरसोबत (Vikas Parashar) तिने आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. राजस्थानमधील रणथंबोरमधील राजवाड्यात त्यांनी सात जन्माच्या गाठी बांधल्या. या विवाहसोहळ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
सोनारिका भदोरिया आणि तिचा विकास पराशर हे विवाहबद्ध झाले. हे जोडपे त्यांच्या लग्नात खूपच सुंदर दिसत होते. वरमाला घालताना हे जोडपे अतिशय आनंदी दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्याने तर विवाहाचा आनंद दिसून आला.
View this post on Instagram
सोनारिका भदौरियाच्या विवाह सोहळ्याची चर्चा...
सोनारिका आणि विकासच्या लग्नाचा सोहळा चार दिवसांपूर्वी सुरू झाला होता. सोनारिकाच्या मेंहदी सोहळ्यात तिच्या 'देवों के देव महादेव' या मालिकेची झलक दिसून आली.
View this post on Instagram
मेंहदीसाठी सोनारिकाने परिधान केला आईचा लेहेंगा
सोनारिकाने आपल्या मेंहदीसाठी आईचा लग्नातील लेहेंगा परिधान केला होता. हिरव्या रंगाच्या वेलवेट टॉपवर लाल लेहेंगा आणि मॅचिंग दुपट्ट्यासह ती सुंदर दिसत होती. विकासने हिरव्या रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला होता.
View this post on Instagram
जिममध्ये झाली होती ओळख
सोनारिकाने तिचा प्रियकर विकास पराशर याच्यासोबत 3 डिसेंबर 2022 रोजी लग्नाची घोषणा केली. तिने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते. काही वृ्त्तांनुसार, सोनारिका विकासला जिममध्ये भेटली आणि या दोघांनी एकमेकांना सात वर्ष डेट केले. त्यानंतर दोघांनी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला.