Bigg Boss 17: नवरा-बायकोमधील वाद वाद टोकाला; बिग बॉसच्या घरात नेमकं कोणत्या कारणामुळे झालं विकी-अंकिताचं भांडण?
Bigg Boss 17: अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) हे बिग बॉसच्या घरात रोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर भांडताना दिसतात.

Bigg Boss 17: अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि अभिनेता विकी जैन (Vicky Jain) यांच्यात बिग बॉसच्या घरात भांडणं झाली आहेत. दोघेही रोज कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर भांडताना दिसतात. नुकताच बिग बॉस 17(Bigg Boss 17) या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये अंकिता आणि विकी यांच्यात मन्नारा चोप्रावरून भांडण झालेली दिसत आहेत.
म्हणून अंकिता आणि विकीमध्ये झालं भांडण
बिग बॉस-17 या कार्यक्रमाचा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये अंकिता विकीसोबत भांडताना दिसत आहे. प्रोमो पाहिल्यानंतर असा अंदाज लावला जात आहे की, मन्नारासोबत विकी बोलत होता त्यामुळे अंकिता त्याच्यावर भडकली आहे. विकी मन्नराला विचारतो की, 'तू रात्री जेवण का केले नाही? आणि तू उदास का दिसत आहे?'. अंकिता तिथे उभी राहून मन्नारा चोप्रा आणि विकी यांचे बोलणे ऐकत असते. अशातच अंकिता आणि विकी यांच्यातील वाद सुरु होतो.
विकी आणि अंकिता यांच्यातील वाद वाढतो. विकी अंकिताला सांगतो की, "जेव्हा मुनव्वर दुःखी असतो तेव्हा तू त्याला मिठी मारली आणि त्याचा हात धरला. मी तुला स्वातंत्र्य देतो." विकी पुढे म्हणतो की, जर तिने मुनव्वरशी बोलले नाही तर तो मन्नराशी बोलणार नाही.
पाहा प्रोमो:
View this post on Instagram
गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरात विकी आणि अंकिता यांच्यात वाद होत आहेत. काही दिवसांपूर्वी देखील अंकिता आणि विकीचं भांडण झालं होतं.
अंकितानं बग बॉसच्या घरात काढला घटस्फोटाचा विषय
बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये आयशा खानने विकीला त्याच्या वैवाहिक जीवनाबद्दल विचारले, ज्यावर विकीने जोक केला आणि विवाहित पुरुषाच्या त्रासाबद्दल सांगितले. त्यानंतर अंकिता विकीवर भडकली. ती म्हणाली, "तुला एवढा त्रास होत असेल तर तू माझ्यासोबत का आहेस? चल घटस्फोट घेऊ, मला तुझ्याबरोबर घरी परत जायचे नाही."
ऐश्वर्या शर्मा,नील भट्ट, मुनव्वर फारुकी,मनारा चोप्रा,नावेद सोल,अनुराग डोभाल,जिग्ना वोरा,सोनिया बन्सल यांनी देखील बिग बॉस-17 या शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला आहे. प्रेक्षक बिग बॉसच्या आगामी एपिसोडची उत्सुकतेने वाट बघत असतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
