VIDEO: अंकिता आणि विकीमध्ये पुन्हा कडाक्याचं भांडण; 'या' कारणामुळे बिग बॉसच्या घरात दोघांमध्ये झाली तू-तू मैं-मैं
Bigg Boss 17: अंकिता ही बिग बॉसच्या घराची कॅप्टन झाली आहे. अंकिता कॅप्टन झाल्यानंतर देखील विकी आणि तिचं कडाक्याचं भांडण झालं आहे.
Bigg Boss 17: छोट्या पडद्यावरील बिग बॉस 17 (Bigg Boss 17) या शोमध्ये अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि विकी जैन (Vicky Jain) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून भांडण सुरू आहे. त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी विकीची आई आणि अंकिताची आई देखील शोमध्ये आली होती. त्या दोघींनीही अंकिता आणि विकीला समजवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या बोलण्याचा विकी आणि अंकितावर फारसा परिणाम झालेला दिसत नाहीये. कारण दोघेही अनेकदा शोमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून भांडताना दिसतात. आता अंकिता ही बिग बॉसच्या घराची कॅप्टन झाली आहे. अंकिता कॅप्टन झाल्यानंतर देखील विकी आणि तिचं कडाक्याचं भांडण झालं आहे.
'या' कारणामुळे अंकिता आणि विकीमध्ये झालं कडाक्याचं भांडण
बिग बॉस-17 या कार्यक्रमाच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की, अंकिता आणि विकी हे दोघे भांडण करत आहेत. प्रोमोच्या सुरुवातीला दिसते की अंकिता विकीला म्हणते, कॅप्टनचा आदर करा.त्यानंतर विकी म्हणतो की," कॅप्टनचे वागणे बघूनच कॅप्टनचा आदर केला जाईल."
अंकिता विकीला म्हणते, "तुला फक्त अहंकार दाखवायला येतो, दुसरं काही येत नाही' यावर विकी म्हणतो की, "मला काय येतं हे मला माहित आहे. तू निघ" मग अंकिता विकीला म्हणाली,"तू इथून निघून जा, तू उद्धट आहेस." तेव्हा विकी म्हणतो की," तू उद्धट आहेस". प्रोमोला कॅप्शन देण्यात आले," विकीने कॅप्टन अंकिताचा अनादर केला, त्याचे काय परिणाम होतील?"
पाहा प्रोमो :
View this post on Instagram
विकीची आई आणि अंकिताची आई या दोघी काही दिवसांपूर्वी बिग बॉस या कार्यक्रमामध्ये आल्या होत्या. त्या दोघींनी विकी आणि अंकिता यांना भांडण न करण्याचा सल्ला दिला होता. पण तरी देखील विकी आणि अंकिता यांच्यात वाद होत आहेत. अंकिताने विकीच्या आईला सांगितले की, 'आई, मी त्याची काळजी घेईन'. यावर विकीची आई म्हणते, 'नाही, तू त्याची काळजी घेत नाहीयेस. तो रडत आहे'
अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांनी 14 डिसेंबर 2021 रोजी लग्न केले.तर विकी हा एक उद्योगपती आहे.बिग बॉस-17 मध्ये अनेकवेळा भांडल्यामुळे नेटकरी अंकिता आणि विकी यांना बऱ्याच वेळा ट्रोल करतात.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या:
Bigg Boss 17: बिग बॉसच्या घरात कडाक्याचं भांडण; अभिषेक कुमार आणि विकी जैन यांच्या बाचाबाची