Tejaswini Lonari Old Statement On Engagement: '50 जणांनी प्रपोज केलं, पण लग्नासाठी एकही स्थळ नाही...'; साखरपुड्यानंतर तेजस्विनी लोणारीचं जुनं वक्तव्य व्हायरल
Tejaswini Lonari Old Statement On Engagement: तेजस्विनीच्या साखरपुड्याच्या फोटो आणि व्हिडीओंसोबत तिचं एक जुनं वक्तव्य व्हायरल होतंय. तेजस्विनीनं काही दिवसांपूर्वीच लग्नाबाबत वक्तव्य केलेलं. 50 जणांनी प्रपोज केलं असेल, पण लग्नासाठी एकही स्थळ आलं नाही..., असं तेजस्विनी म्हणालेली.

Tejaswini Lonari Old Statement On Engagement: मराठी अभिनेत्री (Marathi Actress) तेजस्विनी लोणारी (Tejaswini Lonari) आणि शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकर (Shiv Sena Leader Samadhan Saravankar) यांच्या साखरपुड्याच्या (Tejaswini Lonari Samadhan Saravankar Engagement Photo) बातमीनं मराठी रसिक-प्रेक्षकांना सुखद धक्का बसला. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो, व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच, चाहत्यांकडून मराठी सिनेसृष्टीतल्या असंख्य कलाकारांकडून तेजस्विनीवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. आता लवकरच दोघांचा लग्नसोहळाही पार पडणार आहे. अशातच आता तेजस्विनीच्या साखरपुड्याच्या फोटो आणि व्हिडीओंसोबत तिचं एक जुनं वक्तव्य व्हायरल होतंय. तेजस्विनीनं काही दिवसांपूर्वीच लग्नाबाबत वक्तव्य केलेलं. 50 जणांनी प्रपोज केलं असेल, पण लग्नासाठी एकही स्थळ आलं नाही..., असं तेजस्विनी म्हणालेली.
दिसायला सुंदर, लग्नासाठी अनेकांनी मागणी घातली असेल? तेजस्विनी लोणारी म्हणालेली...
'राजमंच'युट्यूब चॅनलला काही दिवसांपूर्वी मराठी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीनं मुलाखत दिलेली. या मुलाखतीत तिला विचारलेलं की, दिसायला सुंदर, घारे डोळे...लोकप्रिय अभिनेत्री म्हटल्यानंतर तुला तर लग्नाच्या अनेक मागण्या येत असतील, तरीही तू अजून लग्न केलं नाही? यावर उत्तर देताना तेजस्विनीनं सांगितलेलं की, 'याला माझा निषेध आहे... मला आजपर्यंत एकही स्थळ आलं नाहीये. इतकंच काय तर माझ्या वडिलांनाही विचारा..."
View this post on Instagram
अभिनेत्री तेजस्विनी लोणारी म्हणालेली की, "आता मला खरंच थोडं वाईटही वाटायला लागलंय. आता अनेक कलाकारांची लग्न झाली, साखरपुडे होतायत... हिचं पण लग्न झालं, अरे तिचं पण झालं... असं वाटतं मला... माझ्या बाबांनी अनुरुपवर रजिस्टर केलेलं. पण काही नाही झालं... 50 जणांनी प्रपोज केलं असेल, पण लग्नासाठी एकही स्थळ आलं नाही..." तसेच, लग्नसंस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. योग्य पार्टनर भेटला की नक्की लग्न करणार, असंही तेजस्विनीनं आणखी एका मुलाखतीत म्हटलं होतं.
"मी पुण्याची आहे. माझं आजोळ येवला आहे. वडील आर्मीमध्ये असल्यामुळे माझं लहानपण सतत स्थलांतरात गेलं. मात्र नंतर आम्ही पुण्यात स्थायिक झालो. दहावीनंतर मी पुण्यात कॉलेज करत होते आणि पुढे करिअरसाठी मुंबईत आले. मला बऱ्याच मुलांनी प्रपोज केलं, किमान 50 मुलांनी तरी. सगळे म्हणायचे की, तू खूप सुंदर दिसतेस, तुझ्या मागे मुलांची रांग लागलेली असेल. पण प्रत्यक्षात मला कोणीच तसं येऊन अप्रोच केलं नाही... कदाचित लोकांना वाटायचं की, मी आधीच रिलेशनशिपमध्ये आहे. अनेकांनी प्रपोज केलं, पण लग्नासाठी कोणीच विचारलं नाही... मी 2006 पासून इंडस्ट्रीत आहे. पण मला इंडस्ट्रीतील कोणीच आवडलं नाही. कॉलेजमध्येसुद्धा मी करिअरकडे लक्ष देणारी मुलगी होते. त्यामुळे तिथेही मी कधी प्रेमात पडले नाही...", असं तेजस्विनी लोणारी म्हणालेली.
तेजस्विनी लोणारीबाबत थोडसं...
बिग बॉस मराठीमुळे घराघरांत पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री तेजस्विनी लोणारीनं 'चित्तोड की रानी पद्मिनी' या हिंदी मालिकेतून रुपेरी पडदा गाजवलेला. त्यानंतर मात्र तिनं मराठीत पाऊल टाकलं आणि अनेक भूमिका केल्या. मकरंद अनासपुरेसोबतचा तिचा 'छापा काटा' सिनेमाही विशेष गाजलेला. तसेच, ती 'बिग बॉस मराठी सीझन 4'मध्ये स्पर्धक म्हणून दिसली होती, जिथे तिचा स्पष्टवक्तेपणा आणि आत्मविश्वास प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
काही दिवसांपूर्वीच मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन झालं. त्यानंतर तेजस्विनी लोणारीनं तिला झी मराठीवरच्या 'तुझेच मी गीत गात आहे' मालिकेत रिप्लेस केलेलं. अभिनयासोबतच तेजस्विनीने निर्माती म्हणूनही नवा प्रवास सुरू केला आहे. काही महिन्यांपूर्वीच तिनं स्वतःचं प्रोडक्शन हाऊस 'तेजक्राफ्ट' सुरू केलंय. याशिवाय ती सामाजिक कार्यातही सक्रिय असून, तिनं स्वतःची एनजीओ स्थापन केली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























