एक्स्प्लोर

Siddharth Jadhav : तू चाल पुढं...! मुंबईत भर पावसात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना सिद्धार्थचा सल्युट; सेल्फी काढत शेअर केला व्हिडीओ 

Siddharth Jadhav : मुंबईत भर पावसात त्यांचं कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना अभिनेता सिद्धार्थ जाधवने सल्युट केलं आहे. 

Siddharth Jadhav :  अनेक महिन्यांपासून मुंबईकर वाट पाहत असलेला पाऊस आज अखेर कोसळला. पण मुसळधार पावसामुळे दरवर्षीप्रमाणे मुंबई ठप्प झाली. या मुसळधार पावसातही मुंबई पोलीस त्यांचं कर्तव्य बजावताना दिसले. याच मुंबई पोलिसांना अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) याने सल्युट केलाय. मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचे बरेच हाल झालेत. 

बऱ्याच रस्त्यांवर पाणी साचलं, रेल्वे रुळावर पाणी साचलं त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले. मुंबईतल्या मुसळधार पावसातही मुंबई पोलीस मात्र त्यांच्या ड्युटीवर होते. याच ऑन ड्युटी पोलिसांसोबत सिद्धार्थने वेळ घालवला. मुंबईतील गिरगांव चौपाटीवरील सिद्धार्थचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सिद्धार्थने पोलिसांसोबत शेअर केला सेल्फी

सिद्धार्थने पोलिसांसोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. सिद्धार्थने पोलिसांसोबत सेल्फी घेतला. त्याने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत त्याला सिंबाचं टायचल सॉन्ग लावलं आहे. त्याचप्रमाणे त्याला त्याने हॅशटॅगमध्ये मुंबई पोलीस, सल्युट, ऑन ड्युटी सिंबा हे वापरलं आहे.  

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ABPmajha (@abpmajhatv)

मेहनतीच्या जोरावर गाठला यशाचा टप्पा

सिद्धार्थ जाधव मराठी मनोरंजनसृष्टीतील सुपरस्टार आहे. आजवर त्याने अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे. हिंदी मनोरंजनसृष्टीतही आघाडीच्या बॉलिवूड कलाकारांसोबत त्याने काम केलं आहे. आता इंग्लिश चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी तो सज्ज आहे. कॉलेजमध्ये असताना एकांकिका करत त्याने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवलं. रंग, रुप या गोष्टींकडे दुर्लक्ष करत केवळ अभिनयाच्या जोरावर त्याने यशाचा टप्पा गाठला आहे. सिद्धार्थच्या आगामी सिनेमांची प्रेक्षकांना आता उत्सुकता आहे. सिद्धार्थचा 'लग्न कल्लोळ' हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली.                                                                                

ही बातमी वाचा : 

Hollywood Movies Banned In India Watch On OTT:  ओटीटीवर आहे भारतात अश्लीलतेमुळे बंदी असलेले हॉलिवूड चित्रपट, कोणत्या प्लॅटफॉर्मवर पाहाल?

महत्त्वाच्या बातम्या

मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
मंत्रालयात सुनेत्रा पवारांसमोर जमली पूजा सावंतच्या सिनेमाची टीम; पोस्टर पाहिलंत?
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Zoya Akhtar on Zindagi Na Milegi Dobara 2: 15 वर्षांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट 
15 वर्षांनंतर 'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सीक्वेल? झोया अख्तरने दिली मोठी अपडेट 

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Embed widget