Shoaib Ibrahim Dipika Kakar on Pahalgam Terrorist Attack: दहशतवादी हल्ल्यापूर्वी पहलगाममध्येच फिरत होतं स्टार कपल, पण सुदैवानं...; घटनेनंतर पोस्ट करत दिली महत्त्वाची माहिती
Shoaib Ibrahim Dipika Kakar on Pahalgam Terrorist Attack: ते म्हणतात ना दैव बलवत्तर म्हणून स्टार कपल आणि त्यांचं लहान बाळ तिघेही सुखरुप आहेत.

Shoaib Ibrahim Dipika Kakar on Pahalgam Terrorist Attack: प्रसिद्ध टेलिव्हिजन (Celebrity) अभिनेता शोएब इब्राहिम (Shoaib Ibrahim) आणि दीपिका कक्कर (Dipika Kakar) काही दिवसांपासून त्यांच्या कुटुंबासह काश्मीरच्या खोऱ्यात फिरत होते आणि तिथून त्यांच्या फॅन्ससोबत व्हिडीओ आणि फोटो सतत शेअर करत होते. जशी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती समोर आली, तसे चाहते दोघांच्याही काळजीनं व्याकूळ झाल्याचं पाहायला मिळालं. अनेकांना दोघांच्या सोशल मीडिया पोस्टच्या खाली कमेंट करुन त्यांना त्यांची ख्याली-खुशाली विचारायला सुरुवात केली. पण, ते म्हणतात ना दैव बलवत्तर म्हणून शोएब, दीपिका आणि त्यांचं लहान बाळ तिघेही सुखरुप आहेत.
शोएब इब्राहिमनं सोशल मीडियावर पोस्ट करत आपली ख्याली-खुशाली चाहत्यांसोबत शेअर केली आहे. शोएबनं पोस्टमध्ये सांगितलं की, तो दीपिकासोबत कश्मिर पहलगाममध्येच होता. पण, मंगळवारी सकाळीच त्यांनी कश्मीरहून परतीचा प्रवास सुरू केला होता.
शोएब इब्राहिमनं इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये त्यानं लिहिलंय की, "तुम्हाला सर्वांना आमच्या सुरक्षेची काळजी आहे. आम्ही सर्वजण सुरक्षित आहोत. आम्ही मंगळवारी सकाळीच कश्मीर सोडलंय आणि आता दिल्लीला सुरक्षित पोहोचलो आहोत. आमच्याबद्दल काळजी केल्याबद्दल सर्वांचे आभार."
View this post on Instagram
बऱ्याच दिवसापासून कश्मीर फिरतं होतं स्टार कपल
शोएब आणि दीपिका अनेक दिवसांपासून कश्मिरच्या टूरवर होते. दोघेही अनेक दिवसांपासून इन्स्टाग्रामावर वेगवेगळ्या ठिकाणांहून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असल्याचं पाहायला मिळालं होतं. काही दिवसांपूर्वी ते दिल्लीत होता आणि दिल्लीतील पदार्थांचा आस्वाद घेत होते. नंतर दोघेही त्यांच्या कुटुंबासह काश्मीरला गेले. शोएबनं काश्मीरच्या खोऱ्यांमधून दीपिका आणि त्याच्या कुटुंबासोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. मात्र, या हल्ल्याची बातमी आल्यानंतर अनेक चाहते चिंतेत पडले, जे पाहून शोएबनं लगेच आपण सुखरूप असल्याची माहिती सोशल मीडियावरुन शेअर केली.
मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा मोठा दहशतवादी हल्ला झाला. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना लक्ष्य केलं. या हल्ल्यात सुमारे 27 जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे आणि अनेक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यानंतर राज्य आणि केंद्र सरकार सक्रीय झालं आहे. सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान मोदी भारतात परतले असून त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली आहे. गृहमंत्री स्वतः काश्मीरला रवाना झाले आहेत. देशातील सर्व मोठ्या नेत्यांनी या भ्याड घटनेचा निषेध केला आहे आणि दहशतवाद्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नेमकं घडलं काय?
पृथ्वीवरचा स्वर्ग असणारं काश्मीर मंगळवारी दहशतवाद्यांनी रक्तानं माखवलं. निष्पाप पर्यटकांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. पहलगाममध्ये पोलिसांच्या गणवेशात आलेल्या दहशतवाद्यांनी देशीविदेशी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केल्याची माहिती आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पन्नासहून अधिक गोळ्यांची फैर झाडली. त्यामध्ये 26 पेक्षा जास्त पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतांमध्ये दोन परदेशी नागरिकांचाही समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांची नावं आणि धर्म विचारून गोळ्या झाडल्याची माहिती आहे. टीआरएफ या दहशतवादी संघटनेने या भ्याड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलीय. मार्चमध्ये झालेल्या बर्फवृष्टीनंतर शेकडोंच्या संख्येनं पर्यटक काश्मिरमध्ये येत असतात. यंदाही पर्यटन वाढल्यानं सर्वसामान्य काश्मिरी नागरिक आनंदात होते. पण बऱ्याच काळानंतर काश्मिरमध्ये पहिल्यांदाच पर्यटकांना टार्गेट करण्यात आलं.. जम्मू-काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कर घटनास्थळी दाखल झाले असून, परिसराची नाकाबंदी करून, सर्च ऑपरेशन राबवण्यात येतं आहे. पर्यटकांवर झालेल्या गोळीबारानंतर काश्मीरमधील पर्यटक पुन्हा आपापल्या राज्यांमध्ये परतू लागले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
























