Shah Rukh Khan : 'पठाण' सिनेमाचं शूट पूर्ण करून किंग खानचं भारतात आगमन, फोटो व्हायरल
Shah Rukh Khan : बहुप्रतिक्षित पठाण चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करून सुपरस्टार शाहरूख खानचं आज भारतात आगमन झालं आहे.
Shah Rukh Khan : सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan) अखेर त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपट 'पठाण' (Pathaan) चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या सिनेमाचं शूट पूर्ण केल्यानंतर गुरुवारी (आज) तो मुंबई विमानतळावर दिसला होता. यावेळी शाहरूखने मस्त लूक कॅरी केला होता.
या फोटोंमध्ये किंग खान निळ्या डेनिम पॅंटसह त्याने एक पांढरा टी-शर्ट घातला होता. त्याने ब्लॅक कॅप आणि ब्लॅक फेस मास्क असा किंग खानचा लूक होता. यावेळी शाहरूखच्या टीमने टर्मिनल विमानतळावर त्याचे स्वागत केले.
स्पेनमध्ये पठाण चित्रपटाचं शूटिंग सुरु होतं. या चित्रपटात शाहरूख खानबरोबर अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता जॉन अब्राहम हेदेखील मुख्य भूमिकेत आहेत. ‘पठाण’ हा असा पहिला चित्रपट आहे, ज्याचे शूटिंग स्पेनमधील मॅलोर्का येथे झाले आहे. हे एक महागडे, आलिशान ठिकाण आहे आणि ते सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते.
लवकरच लाँच करणार स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म
पत्नी गौरी खानने देखील शाहरुख खानचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले की, ‘पठाण वाईब, लाईक करा.’ बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानदेखील लवकरच स्वतःचा OTT प्लॅटफॉर्म आणणार आहे, ज्याचे नाव आहे 'SRK Plus' असे आहे. शाहरुख डिस्ने प्लस हॉटस्टारसोबत याचे प्रमोशन करत आहे, ज्याची टॅगलाइन 'थोडा रुक शाहरुख' अशी आहे. या टॅगलाईनचा वापर करत, त्याने त्याच्या 'पठाण' चित्रपटातील लूक रिव्हील केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- RRR च्या हिंदी व्हर्जनमध्ये ज्युनियर एनटीआर आणि राम चरणला कोणाचा आवाज; ऐकून तुम्ही व्हाल थक्क
- Shah Rukh Khan : ‘किंग’ खानने दाखवला ‘पठाण’चा किलर लूक, म्हणाला ‘शाहरुख अगर थोडा रुक भी गया...’
- Pathaan : ‘पठाण’ चित्रपटासाठी दीपिका पदुकोण-शाहरुख खान स्पेनमध्ये, ‘या’ दिवशी शूटिंग होणार पूर्ण!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha