Pathaan : ‘पठाण’ चित्रपटासाठी दीपिका पदुकोण-शाहरुख खान स्पेनमध्ये, ‘या’ दिवशी शूटिंग होणार पूर्ण!
Shah Rukh Khan, Deepika Padukone : ‘पठाण’ हा असा पहिला चित्रपट आहे, ज्याचे शूटिंग स्पेनमधील मॅलोर्का येथे झाले आहे. हे एक महागडे, आलिशान ठिकाण आहे आणि ते सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते.
Shah Rukh Khan, Deepika Padukone : शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार असल्याची बातमी समोर आल्यापासून चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. चित्रपटाशी संबंधित प्रत्येक बातमी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच दिवसांनी शाहरुख खान मोठ्या पडद्यावर परतणार आहे. दोघेही काही दिवसांपूर्वी 'पठाण' (Pathaan) चित्रपटाच्या शूटिंगसाठी स्पेनला रवाना झाले होते. आता अशा बातम्या येत आहेत की, दोघेही स्पेनमधील शूटिंग लवकरच संपवतील.
‘पठाण’ हा असा पहिला चित्रपट आहे, ज्याचे शूटिंग स्पेनमधील मॅलोर्का येथे झाले आहे. हे एक महागडे, आलिशान ठिकाण आहे आणि ते सर्वोत्तम पर्यटन स्थळ म्हणूनही ओळखले जाते. सिद्धार्थ आनंद आणि प्रॉडक्शन हाऊसला 'पठाण'साठी असे लोकेशन हवे होते, जे यापूर्वी हिंदी चित्रपटात कधीही दिसले नसेल. मॅलोर्कानंतर, शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण त्यांचे अॅक्शन शेड्यूल पूर्ण करण्यासाठी कॅडिझ आणि जेरेझला रवाना होतील.
‘पठाण’ ठरणार सर्वात मोठा चित्रपट!
मीडिया रिपोर्टनुसार, दोघेही येथे काही खतरनाक अॅक्शन आणि स्टंट सिक्वेन्स शूट करू शकतात. 'पठाण'च्या टीमला 27 मार्चपर्यंत स्पेनचे वेळापत्रक संपवायचे आहे. मेकर्सना ‘पठाण’ हा आतापर्यंतचा सर्वात मोठा चित्रपट बनवायचा आहे. आतापर्यंत लोक शाहरुख खान किंवा दीपिका पदुकोणचे लीक झालेले फोटोंवर जोरदार लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
लीक झालेले फोटो व्हायरल!
शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणही स्पेनमधील या शूटिंगसाठी खूप मेहनत घेत आहेत. त्यांच्या लीक झालेल्या फोटोंमुळे इंटरनेटवर खळबळ उडाली आहे. शाहरुख आणि दीपिका पदुकोणने मॅलोर्कामध्ये एक गाणेही शूट केले आहे. आता, दोघेही लवकरच येथे शूटिंग पूर्ण करून कॅडिझ आणि जेरेझला रवाना होतील. ‘पठाण’ हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा :
- RRR Movie Leak Online : 350 कोटींचं बजेट, रिलीजच्या पहिल्याच दिवशी ‘RRR’ चित्रपट ऑनलाईन लीक!
- आराध्या बच्चनचा ‘स्कूल युनिफॉर्म’मधील फोटो सोशल मीडियावर चर्चेत!
- Video : अनुष्काच्या एका कृतीमुळे विराट कोहलीचा जुगाड गेला वाया! व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतात...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha