एक्स्प्लोर

प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या अडचणीत वाढ; लैंगिक छळाचा गुन्हा दाखल, 'त्या' दिवशी घडलं काय?

Manjummel Boys director Chidambaram S Poduval: सुपरहिट फिल्म मंजुम्मेल बॉइजचे दिग्दर्शक चिदंबरम एस पोडुवल यांच्याविरोधात लैंगिक छळाचा गंभीर आरोप.

Manjummel Boys director: सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.  सुपरहिट फिल्म मंजुम्मेल बॉइजचे दिग्दर्शक चिदंबरम एस पोडुवल यांच्याविरोधात गंभीर आरोप करण्यात आला आहे. लैंगिक छळाच्या आरोपामुळे चिदंबरम एस पोडुवल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.  पोलिसांनी सोमवारी या घटनेची माहिती दिली.  तक्रारीनुसार,  एर्नाकुलम साऊथ पोलीस ठाण्यात दिग्दर्शकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही केस 2022 मध्ये घडलेल्या एका कथित घटनेशी संबंधित असल्याची माहिती आहे. पोलीस आता या प्रकरणाची चौकशी करत आहे. या घटनेनंतर केरळमधील कोची येथे खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. 

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेनं तिच्या तक्रारीत आरोप केला की, ही घटना कोचीच्या एलमकुलम भागातील एका अपार्टमेंटमध्ये घडली. 2022साली दिग्दर्शक तिच्या फ्लॅटमध्ये जबरदस्तीनं घुसला.  त्यानं तिच्यासोबत असभ्य वर्तन केले. तसेच लैंगिक अत्याचार केला, असा गंभीर आरोप महिलेनं केला आहे. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी प्रथम पीडितेचा  जबाब नोंदवला, त्यानंतर तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी सांगितले की, भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम 74 आणि 75 अंतर्गत हा गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.  कलम 74 एखाद्या महिलेच्या  विनयभंगाच्या उद्देशाने तिच्यावर हल्ला करणे किंवा बळजबरी करणे याच्याशी संबंधित आहे.  तर, कलम 75 लैंगिक छळाशी संबंधित आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  कायदेशीर प्रक्रियेनुसार, या प्रकरणात पुढील  कारवाई केली जात आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Filmfare (@filmfare)

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, तक्रार दाखल करण्यापूर्वी महिलेकडून सविस्तर जबाब घेण्यात आला आहे. आता दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे, चित्रपट दिग्दर्शक चिदंबरम एस पोडुवल  याला नोटीस बजावली जाईल. ज्यामध्ये  त्याला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले जाईल. पोलिसांचे म्हणणे आहे की, या प्रकरणाची निष्पक्षपणे चौकशी केली जाईल.  दरम्यान, आरोपी दिग्दर्शकाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

देवाचं रूप अन् डोळ्यांत क्रोध; 'डाळिंब'चा फर्स्ट लूक रिलीज, पंचायत फेम कलाकारासोबत मराठी अभिनेत्री शेअर करणार स्क्रीन

शाही थाटमाट, रॉयल अंदाज; विजय - रश्मिकाच्या लग्नाची धम्माल, VIROSH च्या ग्रँड संगीत सोहळ्याचे PHOTOs

महत्त्वाच्या बातम्या

OTT Webseries: 7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
7 एपिसोडची डार्क थ्रिलर, पहिल्याच सीझनमध्ये झालेली हिट; 3 वर्षांपासून OTTवर चाहते पाहतायत Season 2 ची वाट!
Govinda Spotted With Rumored Girlfriend Marathi Actress: गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
गोविंदाच्या पत्नीचे बोल खरे, 'हिरो नंबर 1'चे 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध? दोघांचा VIDEO Viral
Dil Chahta Hai: 'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
'दिल चाहता है'ची 25 वर्ष; बॉलिवूडच्या आयकॉनिक सिनेमाला होकार देण्यासाठी 'या' कलाकारानं लावलेले 8 महिने! फरहान म्हणाला...
Gashmeer Mahajani Rakhandaar Upcoming Movie: गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...
गश्मीर महाजनीच्या 'त्या' पोस्टमागचं कोडं उलगडलं; मोठा निर्णय घेत सुरू केलीय नवी इनिंग, म्हणाला...

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
आओ भाई, डरो मत, माहितीय तुम्ही 56 इंचवाले आहात, संसदेत एकदा येऊन तरी बघा, राहुल गांधी तुम्हाला काही करणार नाहीत, फक्त थोडी धुलाई करतील; संजय राऊतांचा पीएम मोदी- अमित शाहांवर हल्लाबोल
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
झारखंडमध्येही विद्यार्थ्यांवर लाठीमार, काटेरी तारांचं कुंपण भेदून विद्यार्थी विधानसभेसमोर पोहोचले, नऊ दिवसांपासून उपोषणावर असलेले देवेंद्रनाथ सुद्धा आंदोलनात
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
अवघ्या दोन आठवड्यापूर्वीं शरद पवार भेटल्यानंतर आता सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या खासदारांसह पीएम मोदींच्या भेटीला; अर्ध्या तासाच्या बैठकीत काय घडलं? इनसाईड स्टोरी समोर
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Z+ सुरक्षा असतानाही ममता बॅनर्जींच्या कारवर चिखल आणि गाळ फासला, काहींनी तर चपला आणि दगडही फेकले; दीदी म्हणाल्या, 'तर माझं डोकं फुटलं असतं..'
Embed widget