Samantha Ruth Prabhu : नागा चैतन्यला अनफॉलो केल्यानंतर समंथाची पोस्ट, म्हणाली ‘आता पुढे...’
Samantha Ruth Prabhu : समंथाने याआधीच तिच्या प्रोफाईलमधून नागासोबतचे सर्व फोटो हटवले होते. समंथाने नागाला अनफॉलो केले आहे, पण तरीही तो मात्र तिला फॉलो करत आहे.
Samantha Ruth Prabhu : दक्षिण मनोरंजन विश्वातील पॉवर कपल समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) आणि नागा चैतन्य (Naga Chaitanya) आता वेगळे झाले आहेत. दोघांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सोशल मीडियावर चाहत्यांना आपण विभक्त झाल्याची माहिती दिली होती. नागा आणि समंथा वेगळे झाल्याची बातमी ऐकून चाहत्यांनाही धक्काच बसला होता. अलीकडेच समंथाने नागाला सोशल मीडियावर देखील अनफॉलो केले आहे. त्यानंतर दोघेही पुन्हा एकत्र येण्याची चाहत्यांची अपेक्षा आता संपली आहे. मात्र, यानंतर समंथाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी व्हायरल झाली आहे.
समंथाने याआधीच तिच्या प्रोफाईलमधून नागासोबतचे सर्व फोटो हटवले होते. समंथाने नागाला अनफॉलो केले आहे, पण तरीही तो मात्र तिला फॉलो करत आहे. नागाला अनफॉलो केल्यानंतर समंथाने एक पोस्ट शेअर केली आहे.
पाहा समंथाची पोस्ट
समंथाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात लिहिले आहे की, ‘कधी कधी ताकद ही तुमच्या आतली इतकी मोठी आग नसते की, प्रत्येकजण ती पाहू शकेल.. कधी कधी ती एक छोटीशी ठिणगीही पुरेशी असते, जी अगदी शांतपणे म्हणते पुढे जा, तुम्हाला जे हवं ते मिळवा.’ समंथाने तिचा माजी पती नागा चैतन्यला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे, पण तरीही ती नागाचा भाऊ अखिल अक्किनेनीला फॉलो करते.
लग्नातील साडी केली परत!
काही काळापूर्वी अशीही बातमी समोर आली होती की, समंथाने तिची लग्नाची साडी नागा चैतन्य आणि त्याच्या कुटुंबाला परत केली आहे. इतकंच नाही, तर दोघं एकत्र येऊ शकतात अशा बातम्याही आल्या होत्या. पण नंतर समंथाने एक वक्तव्य केले आणि ही अफवा असल्याचे म्हटले.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे तर, समंथा सध्या तिच्या आगामी ‘यशोदा’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सध्या तिच्याकडे बरेच प्रोजेक्ट्स आहेत. त्याचवेळी नागा चैतन्य, आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
हेही वाचा :
- 'द कश्मीर फाइल्समध्ये अनेक गोष्टी असत्य, पण..'. संजय राऊत थेटच बोलले
- The Kashmir Files : ‘द कश्मीर फाइल्स’च्या स्क्रीनिंगवेळी कोटात कलम 144, विवेक अग्निहोत्रींनी व्यक्त केला संताप!
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' ला गर्दी कोणाची? भाजपची की सामान्य प्रेक्षकांची?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha