एक्स्प्लोर

CM नितीश कुमार राज्यसभेवर जाणार, लेक निशांतने स्वीकारलं जदयुचं सदस्य; राजकीय प्रवेश होताच म्हणाला...

नितीश कुमार यांच्यानंतर बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याबद्दलही चर्चा सुरू झाल्या आहेत.

पाटणा: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish kumar) राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतल्याने बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. राज्यातून आता केंद्रात जाणाऱ्या नितीश कुमार यांनी बिहारमधील नव्या सरकारला पूर्ण पाठिंबा देण्याचे आश्वासनही दिले. त्यामुळे, बिहारमधील नितीश कुमार युगाचा अंत झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाचा आता त्यांचा मुलगा निशांत कुमारने जदयु पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. आपल्या कुटुंबापासून, आणि राजकीय जीवनापासून दूर असलेल्या निशांत यांनी जनता दल युनायटेड पक्षाचे (JDU) अधिकृत सदस्यत्व स्वीकारत राजकीय प्रवेश केला. त्यामुळे, बिहार सरकारमध्ये त्यांना कोणती जबाबदारी मिळणार याकडे सर्वाचे डोळे लागले आहेत.

नितीश कुमार यांच्यानंतर बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याबद्दलही चर्चा सुरू झाल्या आहेत. पहिल्यांदाच बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होईल का? नितीश कुमार यांच्या जवळच्या व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केले जाईल का? चार दशकांनंतर बिहारला उच्चवर्णीय मुख्यमंत्री मिळेल का? अशा विविधांगी चर्चा देशाच्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यातच, निशांत कुमार यांनी आज जदयु पक्षाचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर नितीश कुमार यांच्या राज्यसभेवर जाण्याच्या निर्णयाबद्दल माहिती दिली. माझ्या वडिलांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला असून तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, पक्षाच्या संघटन मजबुतीसाठी आम्ही त्यांच्या नेतृत्वात काम करत राहू, असेही निशांत कुमार यांनी म्हटले आहे. 

निशांत कुमार उपमुख्यमंत्री होणार?

निशांत कुमार यांनी आज जदयुचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर वडील नितिश कुमार यांची भेट घेतली. यावेळी, वडिलांना पेढा भरवत त्यांचे आशीर्वादही घेतले. बाप-लेकाच्या या भेटीचे फोटो समोर आले आहेत. दरम्यान, बिहारमध्ये निशांत कुमार यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. 

भाजपकडून दोन नावं चर्चेत

भाजपकडून बिहारच्या मुख्यमंत्रीपदासाठी सम्राट चौधरी आणि विजय चौधरी यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र, ऐनवेळी ईबीसी किंवा ओबीसी उमेदवार उभा करून सर्वांना आश्चर्यचकित केलं जाऊ शकते. जर भाजपचा मुख्यमंत्री झाला तर जेडीयूकडून दोन उपमुख्यमंत्री असतील. भाजपकडून एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपला, विशेषतः अमित शाहांना नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी असे वाटत नव्हते. आता, त्यांच्या प्रकृतीबद्दल प्रश्न उपस्थित होत असल्याने, जेडीयू नेत्यांकडून नितीश कुमार यांच्या पसंतीचा नेता मुख्यमंत्री करण्याची मागणी करत आहेत.

हेही वाचा

ममता बॅनर्जींना मी माझ्या छोट्या बहिणीप्रमाणे मानते, पण...; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची जाहीर नाराजी, मुख्यमंत्री फडणवीसांचीही टीका

महेश गलांडे एबीपी माझा डिजिटलमध्ये डेप्युटी प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारितेत एकूण 13 वर्षे आणि डिजिटल पत्रकारितेत 11 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या पाठिशी आहे. यापूर्वी ईटीव्ही मराठी, लोकमत या माध्यम संस्थांमध्ये त्यांनी काम पाहिलं असून राजकीय लेखन, सामाजिक विषयाची जाण व भान आहे. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष, चिन्हावर आज सलग पाचव्या दिवशी सुनावणी

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
Embed widget