एक्स्प्लोर
रिया चक्रवर्तीचा नवा व्हिडीओ व्हायरल, म्हणाली, 'सत्यमेव जयते!'
अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे (Sushant Singh Rajput Death case) वडील के के सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत गुन्हा नोंदवला आहे. या घडामोडी सुरु असतानाच रियाचा (Rhea Chakraborty video) एक व्हिडीओ समोर आला आहे.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे वडील के के सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबावर गंभीर आरोप करत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी रिया सुप्रीम कोर्टात पोहोचली आहे. रियाने स्वतःच्या बचावासाठी देशातील सर्वात मोठ्या वकिलांपैकी एक वकील अॅड. सतीश मानेशिंदे यांना हायर केलं आहे. या घडामोडी सुरु असतानाच रियाने एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यात तिनं माझा देवावर आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं आहे.
व्हिडीओ रिया काय म्हणतेय
अभिनेत्री रिया चक्रवर्तीने जारी केलेल्या व्हिडीओत म्हणाली की, माझा देवावर आणि न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मला न्याय नक्की मिळेल. माझ्याबद्दल प्रसारमाध्यमात खूप वाईट गोष्टी बोलल्या जात आहे. पण माझ्या वकीलांनी मला याबाबत भाष्य करण्यास मनाई केली आहे. हे प्रकरण कोर्टात आहे. याप्रकरणाचे सत्य लवकरच समोर येईल, सत्यमेव जयते!, असे या व्हिडीओत रियाने म्हटलं आहे.
सुशांतच्या वडिलांची तक्रार सुशांत सिंह राजपूतचे वडील के के सिंह यांनी केलेल्या तक्रारीत रिया चक्रवर्तीसह इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरिंडा, श्रुती मोदी आणि इतरांविरोधात फसवूणक, दगाबाजी, ओलीस ठेवणे आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. सुशांतच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे की, "या कटात रिया आणि तिच्या कुटुंबातील इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती यांनी माझ्या मुलासोबत जवळीक वाढवली होती आणि हे सगळेच माझ्या मुलाच्या प्रत्येक बाबत हस्तक्षेप करायला लागले. तसंच सुशांत ज्या घरात राहत होता तिथे भूत-प्रेत असल्याचं सागंत त्याला ते सोडायला लावलं." सुशांत सिंह मृत्यू प्रकरणात पोलिसांवर आरोप करणाऱ्यांवर मुख्यमंत्री ठाकरेंचा संताप सुशांत सिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांवर केल्या जाणाऱ्या आरोपांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगलाच संताप व्यक्त केलाय. एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन कार्यक्रमात झालेल्या विशेष मुलाखतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह लावणाऱ्यांचा मी तीव्र निषेध करतो. सुशांत सिंह प्रकरणात पोलिसांवर आरोप करू नयेत. त्यांच्यावर आरोप म्हणजे कोव्हिड योद्ध्यांवर आरोप आहे. जे कोणी असे आरोप करत आहेत मी त्यांची निंदा करतो, असं ते म्हणाले. संबंधित बातम्या#WATCH: Rhea Chakraborty releases video on #SushantSinghRajputDeathCase. She says, "I've immense faith in God & the judiciary. I believe that I'll get justice...Satyameva Jayate. The truth shall prevail." pic.twitter.com/Fq1pNM5uaP
— ANI (@ANI) July 31, 2020
-
- सुशांतसिंह राजपूतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल
- सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला राजकीय रंग, सुशांतचा मृत्यू बिहार निवडणुकीचा मोठा मुद्दा ठरणार
- आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करेन! सुशांतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट
- काय सांगता हुबेहुब सुशांत सिंह राजपूत?; सोशल मीडियावर 'या' तरूणाचे फोटो व्हायरल
- Dil Bechara Trailer | सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा'च्या ट्रेलरचा रेकॉर्ड; 'एवेंजर्स एंडगेम'लाही टाकलं मागे
- सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सलमान खानची चौकशी होणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement