एक्स्प्लोर

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सलमान खानची चौकशी होणार?

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 35 लोकांची चौकशी केली आहे. त्यामध्ये सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्ती आणि कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा यांचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त चित्रपट दिग्दर्शक, निर्माते संजय लीला भन्साळी, कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे.

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात वांद्रे पोलिसांनी आतापर्यंत जवळपास 35 लोकांची चौकशी केली आहे. यामध्ये सुशांतच्या कुटुंबियांसोबतच, त्याचे मित्र आणि बॉलिवूडमधील अनेक बड्या दिग्दर्शक, निर्मात्यांचाही समावेश आहे. आता असं सांगण्यात येत आहे की, वांद्रे पोलीस अभिनेता सलमान खानला समन्स जारी करुन चौकशी करू शकतात. दरम्यान, न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, पोलीस सध्या सलमान खानची चौकशी करणार नाही. न्यूज 18च्या रिपोर्टनुसार, पोलिसांकडून सलमान खानच्या चौकशीचं वृत्त फेटाळून लावण्यात आलं आहे.

पोलिसांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी सेलिब्रिटी मॅनेजर रेश्मा शेट्टीची चौकशी केली होती. रेश्मा शेट्टी एक सेलिब्रिटी मॅनेजर असून तिने आतापर्यंत सलमान खान, अक्षय कुमार, आलिया भट्ट यांसारख्या अनेक मोठ्या बॉलिवूड सेलिब्रिटींसोबत काम केलं आहे. असं सांगण्यात येत आहे की, सलमान खान आधी सुशांत सिंह राजपूतसोबत चित्रपट करणार होता. परंतु, काही कारणांमुळे हा चित्रपट टाळण्यात आला. तसेच सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतरपासूनच बॉलिवूडमधील नेपोटिझ्मचा मुद्दा गाजत आहे.

पाहा व्हिडीओ : संजय लीला भन्साळी यांच्या चौकशीतून काय माहिती मिळाली?

पाच तास केली रेश्मा शेट्टीची चौकशी

रेश्मा बॉलिवूडमधील आघाडीच्या सेलिब्रिटी मॅनेजर्सपैकी एक आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये रेश्माची जवळपास पाच तास चौकशी करण्यात आली. पोलिसांनी अद्याप रेश्माच्या जबाबासंदर्भात कोणतीच माहिती दिलेली नाही. रेश्माने सलमान खानची मॅनेजर म्हणून 2010 पासून 2018 पर्यंत काम पाहिलं. त्यानंतर ती बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारची मॅनेजर म्हणून काम पाहू लागली. तसेच तिने याआधी आलिया भट्ट आणि कतरीना कैफसाठीही काम पाहिलं आहे.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 35 लोकांची चौकशी केली आहे. त्यामध्ये सुशांतची मैत्रिण रिया चक्रवर्ती आणि कास्टिंग डायरेक्टर मुकेश छाबडा यांचाही समावेश आहे. मुकेश छाबडा यांचा चित्रपट 'दिल बेचारा' अद्याप प्रदर्शित झालेला नाही. या चित्रपटात सुशांतसोबत स्किरन शेअर करणारी अभिनेत्री संजना सांघीची देखील पोलिसांनी चौकशी केली आहे. याव्यतिरिक्त चित्रपट दिग्दर्शक, निर्माते संजय लीला भन्साळी, कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांचीही पोलिसांनी चौकशी केली आहे. सुशांत सिंह राजपूतने 14 जून रोजी वांद्र्यातील राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती.

महत्त्वाच्या बातम्या : 

आयुष्यभर तुझ्यावर प्रेम करेन! सुशांतच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्तीची भावनिक पोस्ट

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्तीची पोलिसांकडून 11 तास चौकशी

काय सांगता हुबेहुब सुशांत सिंह राजपूत?; सोशल मीडियावर 'या' तरूणाचे फोटो व्हायरल

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; आता गळफासाच्या कपड्याचा तपास

महत्त्वाच्या बातम्या

Aryan Khan Spotted with Mystery girl: शाहरुख खानचा लेक आर्यन खान मिस्ट्री गर्लसोबत झाला स्पॉट, 'ती' आहे तरी कोण? दोघांच्या अफेअरची चर्चा
शाहरुख खानचा लेक आर्यन खान मिस्ट्री गर्लसोबत झाला स्पॉट, 'ती' आहे तरी कोण? दोघांच्या अफेअरची चर्चा
Thalapathy Vijays Jana Nayagan: 'जना नायगन'ची क्रेझ झाली कमी; दुसऱ्या गुरुवारी 'इतक्या' कोटींचा गल्ला जमवला, बजेट तरी वसूल करणार का?
'जना नायगन'ची क्रेझ झाली कमी; दुसऱ्या गुरुवारी 'इतक्या' कोटींचा गल्ला जमवला, बजेट तरी वसूल करणार का?
The Accidental Cockroach Party Film On CJP Protest: 'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनावर सिनेमा, 20 कोटींचं बजेट अन् नावंही ठरलं; पण, अभिजीत दीपकेची भूमिका कोण साकारणार?
'कॉकरोच जनता पार्टी'च्या आंदोलनावर सिनेमा, 20 कोटींचं बजेट अन् नावंही ठरलं; पण, अभिजीत दीपकेची भूमिका कोण साकारणार?
Govinda Say No To Tezaab And Anil Kapoor Become Superstar: ज्या फिल्मला गोविंदा म्हणालेला 'NO', त्याच फिल्ममुळे अनिल कपूर बनले सुपरस्टार, 'धकधक गर्स'सोबत रोमान्स करुन 50 आठवडे गाजवलं थिएटर
ज्या फिल्मला गोविंदा म्हणालेला 'NO', त्याच फिल्ममुळे अनिल कपूर बनले सुपरस्टार, 'धकधक गर्स'सोबत रोमान्स करुन 50 आठवडे गाजवलं थिएटर

व्हिडीओ

Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 5 ते 6 जण अडकल्याची भीती
Auto Rickshaw Driver Marathi : रिक्षा...आणि मराठीची बाराखडी, उरले फक्त 2 आठवडे Special Report
Amit Shah vs Rahul Gandhi Pellet Gun : 'कुठे आहेत गृहमंत्री?' प्रश्नांची सरबत्ती Special Report
Girish Mahajan Audio Clip Eknath Khadse Raksha Khadse : क्लिप गावभर, आपत्ती चव्हाट्यावर | ABP Majha Special Report
Ramdev Baba on Gen Z : जेन झींचं आंदोलन, रामदेव बाबांचं 'टीकासन' | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
आधी हाडं मोडलात, आता FIR करून खाती बंद करत आहात, मोदी-शाह तुम्ही 'जनरेशन झेड'ला धमकावून गप्प करू शकत नाही; राहुल गांधींचा हल्लाबोल
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
जगाच्या पाठीवर 'मेन इन ब्लू' ओळख असताना टीम हाॅकी इंडियाची जर्सी भगवी करताच वाद पेटला; देशाच्या हाॅकी नर्सरीतून सुद्धा कडाडून विरोध, दोन माजी कॅप्टनचा तीव्र संताप
Vijay Chaudhari Audio Clip: 'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
'मॅडम भाजपचं बॅक ऑफिस चालवत होत्या'; गिरीश महाजनांनंतर विजय चौधरींची आणखी एक ऑडिओ क्लिप व्हायरल, तत्कालीन पोलीस महासंचालकांचा उल्लेख
Pune Crime News: भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
भिडे पुलाजवळ पाण्यात..., पोलिसांना आला फोन; मुळा मुठा नदीपात्रात आढळला मृतदेह; अपघात की घातपात शोध सुरू
Israel-Hamas Gaza War: मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार
मोठी बातमी! गाझा पट्टीतला संघर्ष अखेर संपण्याची चिन्हं; ऐतिहासिक कराराला हमासची सहमती, इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने माघार घेणार, डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती
Bhiwandi Building Collapses: भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
भिवंडीत पत्त्यांसारखी चार मजली इमारत कोसळली; 8 जणांचा मृत्यू, यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जूनी चाळ तोडावी लागली
Devoleena Bhattacharjee On Reservation Comment: 'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
Pune Rain Alert : पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
पुणेकरांनो छत्री, रेनकोट सोबत ठेवा; पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा इशारा; शहरासह जिल्ह्यात पुढील चार दिवस मुसळधार, पुढील 48 तास महत्त्वाचे
Embed widget