Ranbir Kapoor, Alia Bhatt : आलिया नाही तर 'या' व्यक्तीसोबत रणबीरनं पाहिला ताजमहल ; पोस्ट चर्चेत
Ranbir Kapoor, Alia Bhatt : रणबीरचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Ranbir Kapoor, Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते. काही दिवसांपूर्वी रणबीर कपूर, अर्जुन कपूर (Arjun Kapoor) आणि श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) या कलाकारांनी लव रंजनच्या (Luv Ranjan) लग्नसोहळ्याला हजेरी लावली. हा सोहळा आग्रा येथे होता. यावेळी रणबीर आणि अर्जुन हे ताजमहल पाहण्यासाठी गेलो होते. रणबीरचा ताजमहलसोबतचा फोटो शेअर करून अर्जुननं आलियाला टॅग केलं आहे.
एका मुलाखतीमध्ये आलियानं अर्जुननं शेअर केलेल्या रणबीरच्या फोटोबद्दल सांगितलं, 'अर्जुन कार्टून आहे. रणबीर तिथून परत आला आहे. सध्या तरी आम्ही ताजमहाल पाहण्याचा प्लॅन केला नाही. पण मला त्याचा हा फोटो आवडला. '
अर्जुननं शेअर केलेल्या पोस्टला अभिनेत्री रकुलप्रीतनं कमेंट केली, 'तुम्ही दोघांनी ताजमहल पाहिला' तर या कमेंटला अर्जुननं रिप्लाय दिला, 'हो आलियासोबत नाही तर माझ्यासोबत रणबीरनं पहिल्यांदा ताजमहल पाहिला.'
View this post on Instagram
आलिया आणि रणबीरची ओळख ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटा दरम्यान झाली. त्यानंतर ते दोघेही अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नाला उपस्थित होते. त्यामुळे या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू होती. लवकरच ते लग्न बंधनात अडकणार आहेत., असही म्हटलं जात आहे. ब्रह्मास्त्र हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Farhan-Shibani Post Marriage : फरहान-शिबानीने लग्नानंतर पापाराझींना दिली मिठाईची भेट
- Farhan-Shibani Wedding : लग्नाआधीच फरहान-शिबानीकडे गुडन्यूज? सोशल मीडियावर चर्चांना उधाण!
- Farhan Shibani Wedding : मुलाच्या लग्नात जावेद अख्तरांनी केले कविता वाचन
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha