Brahmastra 2: ब्रह्मास्त्र-2 च्या शूटिंगला कधी सुरुवात होणार? रणबीर कपूर म्हणाला...
'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) चित्रपटातील आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळाली. आता प्रेक्षक ब्रह्मास्त्र- 2 (Brahmastra 2) ची उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Brahmastra 2: गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली. या चित्रपटातील VFX, डायलॉग्स आणि कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टींना प्रेक्षकांची पसंती मिळाली. चित्रपटातील आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळाली. आता ब्रह्मास्त्र चित्रपटाचा दुसरा भाग देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ब्रह्मास्त्र-2 च्या शूटिंगबद्दल तसेच या चित्रपटाच्या स्क्रिप्टबद्दल रणबीरनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
काय म्हणाला रणबीर?
एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये रणबीरला ब्रह्मास्त्रच्या सिक्वेलबाबत विचारण्यात आलं. त्या प्रश्नाचं उत्तर देत रणबीरनं सांगितलं, 'ब्रह्मास्त्र-2 च्या स्क्रिप्टचं लिखाण सध्या अयान मुखर्जी करत आहे. 2023 च्या शेवटी किंवा 2024 च्या सुरुवातीला या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्याचा प्लॅन अयान करत आहे.' रणबीरच्या या उत्तरानं अनेकांचे लक्ष वेधले.
ब्रह्मास्त्रची तगडी स्टार कास्ट
ब्रह्मास्त्र चित्रपटामध्ये आलिया आणि रणबीरसोबतच अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय या कलाकारांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणनं या चित्रपटामध्ये छोटी पण महत्त्वाची भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावर ब्रह्मास्त्र चित्रपटातील शाहरुख आणि दीपिकाच्या लुक्सचे फोटो व्हायरल झाले होते. ब्रम्हास्त्र चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जीनं केलं आहे.
View this post on Instagram
शिवा आणि ईशाची कहाणी
अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र पार्ट वन शिवा' हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. अस्त्रांची दुनिया दाखवणाऱ्या या चित्रपटात व्हीएफएक्सचा चांगला वापर करण्यात आला आहे, जो प्रेक्षकांना चित्रपटाकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरला. या चित्रपटात शिवा ही भूमिका रणबीरनं आणि ईशाही भूमिका आलियानं साकारली आहे. चित्रपटातील आलिया आणि रणबीर यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. या चित्रपटाची निर्मिती 410 कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. ब्रह्मास्त्र या चित्रपटातील देवा देवा आणि केसरिया या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. आता ब्रह्मास्त्र-2 चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: