Alia Ranbir Wedding: रणबीर आणि आलियाच्या लग्नावर राखी सावंतची मजेशीर प्रतिक्रिया; म्हणाली, 'मी हुंडा...'
Alia Ranbir Wedding : अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांच्या लग्नावर आता राखी सावंतनं प्रतिक्रिया दिली आहे.
Alia Ranbir Wedding : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. राखी वेगवेगळ्या विषयांवरील तिची मतं मांडते. सध्या सोशल मीडियावर अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट (alia bhatt) यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. त्यांच्या लग्नावर आता राखी सावंतनं प्रतिक्रिया दिली आहे.
रणबीर आणि आलिया यांच्या लग्नाबाबत राखी सांवत म्हणाली, 'आलिया खूप चांगली मुलगी आहे. तसेच ती लकी देखील आहे. तिचे गंगूबाई काठियावाडी आणि आरआरआर हे चित्रपट हिट ठरले. आता ती लग्न करत आहे. तसेच तिला हॉलिवूडमध्ये काम करण्याची देखील संधी मिळत आहे. मी हुंडा म्हणून लग्नामध्ये तिच्यासोबत जाईल. मी तिच्या बॅगमध्ये बसून देखील जायला तयार आहे.' रिपोर्टनुसार आलिया आणि रणबीर हे 14 एप्रिल रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. 12 एप्रिल रोजी त्यांचे प्रीवेडिंग कार्यक्रमांना सुरूवात होईल.
नीतू कापूर यांदी दिली होती प्रतिक्रिया
नीतू सिंह यांना एका मुलाखतीमध्ये 'रणबीर आणि आलियाच्या लग्नाची तारिख काय आहे?' असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी 'देवालाच माहिती', असं उत्तर दिलं. तर नीतू सिंह यांनी पुढे सांगितलं, 'मला सेलिब्रेट करायचं आहे, लोकांना देखील याबाबत सांगायचंय पण आजच्या पिढीतील मुलं थोडा वेगळा विचार करतात. मला त्यांच्या लग्नाबाबत काहीही माहित नाही. कारण ते दोघे त्यांच्या गोष्टी प्रायव्हेट ठेवतात. ते कधी लग्न करतील ते माहित नाही पण माझी इच्छा आहे की त्यांनी लवकरच लग्नगाठ बांधावी. आलिया खूप चांगली मुलगी आहे. त्या दोघांची छान जोडी होऊ शकते.'
हेही वाचा :
- Aai Kuthe Kay Karte : अनिरुद्ध स्वतःच्या आईला घराबाहेर काढणार? मालिकेत येणार मोठा ट्विस्ट!
- Alia Bhatt,Ranbir Kapoor : रणबीरची होणारी 'दुल्हनिया' आलियाकडे भारताचं नागरिकत्व नाही; मुंबईत जन्म पण...
- Happy Birthday Ayesha Takia : सलमानच्या ‘वॉन्टेड’मधून मिळवली तुफान लोकप्रियता, आता लग्न करून संसारात रमलीये आयेशा टाकिया!