Ram Charan : राम चरणची एक झलक पाहण्यासाठी हॉटेलच्या भिंतीवर चढले चाहते; फुलांचा वर्षाव करून केलं स्वागत
राम चरण (Ram Charan) या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते हॉटेलच्या भिंतीवर चढले.
Ram Charan : दाक्षिणात्य अभिनेता राम चरणचा (Ram Charan) चाहता वर्ग मोठा आहे. आरआरआर (RRR) या चित्रपटामुळे राम चरणला विशेष लोकप्रियता मिळाली. नुकताच राम चरण हा विशाखापट्टणम येथे त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी गेला होता. यावेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते एक भिंतीवर चढले. त्याच्या चाहत्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सध्या राम चरण हा दिग्दर्शक शंकर यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याच्यासोबतच अभिनेत्री कियारा अडवाणी देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. राम चरण हा या चित्रपटामध्ये आयएएस ऑफिसरची भूमिका साकारणार आहे.
विशाखापट्टणममध्ये चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी जेव्हा राम चरण एरपोर्टवर आला, तेव्ह लोकांनी त्याच्यावर फुलांचा वर्षाव केला. राम चरण येताच लोक जोरजोरात ओरडू लागले.
Craze of Ram Charan at Vizag airport 🔥🔥🔥💥💥💥@AlwaysRamCharan #RamCharan #RC15 @TrendsRamCharan #RamCharan𓃵 pic.twitter.com/rHIDcZbgR2
— Being Human 💖💖 (@beinghuman_5) May 4, 2022
दुसऱ्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, लोक राम चरण ज्या हॉटेलमध्ये राहात आहे तिथे येऊन भिंतीवर चढून लोक राम चरणची झलक पाहण्याचा प्रयत्न करत आहेत.
Craziest Crowd & People in Vizag going Maddd for RAM CHARAN In Radisson Hotel🔥🔥
— Kalyan Dhoni (@KalyanDhoni3) May 4, 2022
Insane Love for Man Of Masses @AlwaysRamCharan in Vizag...!!
#ManOfMassesRamCharan #RamCharanInVizag #RC15 pic.twitter.com/Azu0ltzPKg
दिग्दर्शक शंकर यांच्यासोबतचा राम चरणचा हा पहिला चित्रपट आहे. त्यांच्या या आगामी चित्रपटामधून राम चरण तेलगू चित्रफटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटाचे शूटिंग अमृसर येथे सुरू करण्यात आलं. अमृतसरला गेल्यानंतर राम चरणनं बॉर्डर सिक्योरिटी फोर्सची भेट घेतली. त्यानंतर त्यानं पत्नी उपासनासोबत गोल्डन टेम्पलला भेट दिली.
महत्वाच्या बातम्या :