(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Victoria Marathi Film : पुष्कर, सोनाली आणि आशयची भन्नाट केमिस्ट्री; 'व्हिक्टोरिया' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस
'व्हिक्टोरिया' या चित्रपटात अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog), सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) आणि आशय कुलकर्णी (Aashay Kulkarni) हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
Victoria Marathi Film : निर्माता आनंद पंडित आणि अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog) यांचा 'व्हिक्टोरिया' (Victoria) हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. वेल डन बेबी या चित्रपटांच्या यशानंतर आनंद पंडित मोशन पिक्चर एल एल पी आणि गुसबम्प्स एंटरटेनमेंट यांनी नुकतीच 'व्हिक्टोरिया' या नव्या चित्रपटाची घोषणा केली.
'व्हिक्टोरिया' या चित्रपटात अभिनेता पुष्कर जोग (Pushkar Jog), सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) आणि आशय कुलकर्णी (Aashay Kulkarni) हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हीरा सोहल ही अभिनय क्षेत्रात पदार्पण करत असून जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी हे दिग्दर्शनात पदार्पण या चित्रपटामधून करत आहेत.
View this post on Instagram
'व्हिक्टोरिया' चित्रपटाची कथा पटकथा आणि संवाद ओमकार गोखले, जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत.आनंद पंडित , रूपा पंडित आणि पुष्कर जोग हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. वैशल शाह हे सह निर्माता आहेत. नुकतेच या चित्रपटाच्या मुहूर्त संपन्न झाला आणि या बिग बजेट चित्रपटाची शूटिंग स्कॉटलंड येथे होणार आहे. या चित्रपटामध्ये पुष्कर जोग, सोनाली कुलकर्णी आणि आशय कुलकर्णी यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.
संबंधित बातम्या
Katrina Vicky Weeding : कतरिना-विकीला सलमान खान, रणबीर कपूरकडूनही महागड्या भेटवस्तू; काय आहे गिफ्ट्सची यादी?
बॉलिवूडला कोरोनाचा विळखा, करीनानंतर संजय कपूर आणि सोहेल खानच्या पत्नीला कोरोनाची लागण