Katrina Vicky Weeding : कतरिना-विकीला सलमान खान, रणबीर कपूरकडूनही महागड्या भेटवस्तू; काय आहे गिफ्ट्सची यादी?
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल (Katrina Kaif) आणि कतरिना कैफ (Vicky Kaushal) यांचा शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला.
![Katrina Vicky Weeding : कतरिना-विकीला सलमान खान, रणबीर कपूरकडूनही महागड्या भेटवस्तू; काय आहे गिफ्ट्सची यादी? katrina kaif and vicky kaushal received expensive gifts from salman khan ranbir kapoor and other bollywood celebrity Katrina Vicky Weeding : कतरिना-विकीला सलमान खान, रणबीर कपूरकडूनही महागड्या भेटवस्तू; काय आहे गिफ्ट्सची यादी?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/12/14/91e65511a50be8d16ce45cc3e2751632_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Katrina Kaif and Vicky Kaushal gets expensive gifts from Salman – Ranbir : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल (Katrina Kaif) आणि कतरिना कैफ (Vicky Kaushal) यांचा शाही विवाह सोहळा नुकताच पार पडला. राजस्थानच्या बरवारा येथील सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये त्यांचा विवाहसोहळा पार पडला. अनेक बॉलिवूड कलाकारांनी विकी आणि कतरिनाला महागडं गिफ्ट दिलं आहे. एका रिपोर्टनुसार, ह्रतिक रोशन (Hrithik Roshan), तापसी पन्नू (Taapsee Pannu), शाहरुख खान (Shahrukh Khan), रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि सलमान खान (Salman Khan) यांनी विकी आणि कतरिनाला हटके गिफ्ट्स दिले आहेत.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानने कतरिना आणि विकीला एक पेंटिंग गिफ्ट दिली आहे. त्या पेंटिंगची किंमत दिड लाख रूपये आहे. तसेच ह्रतिक रोशनने कतरिना आणि विकीला BMW G310 R ही बाइक गिफ्ट दिली आहे. या बाइकची किंमत तीन लाख रूपये आहे. अभिनेत्री तापसी पन्नूने प्लॅटिनम ब्रेसलेट विकीला गिफ्ट दिलं आहे. विकी आणि तापसीने मनमर्जीया या चित्रपटात केले होते. या चित्रपटातील दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
View this post on Instagram
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने देखील विकी आणि कतरिनाला गिफ्ट दिलं आहे. रिपोर्टनुसार, सलमानने 3 कोटी रूपयांची रेंज रोव्हर विकी आणि कतरिनाला दिली आहे. तसेच अभिनेता रणवीर कपूर दिड कोटी रूपयांपेक्षा जास्त किंमत असणारा डायमंड नेकलेस कतरिनाला दिला आहे.
संबंधित बातम्या
बॉलिवूडला कोरोनाचा विळखा, करीनानंतर संजय कपूर आणि सोहेल खानच्या पत्नीला कोरोनाची लागण
Kangana Ranaut : कंगनाविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करा, गीतकार जावेद अख्तर यांची अंधेरी दंडाधिकारी कोर्टाकडे मागणी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)