
Raj Kundra Case : राज कुंद्रा आपले बोल्ड व्हिडीओ शिल्पा शेट्टीला दाखवायचा; शर्लिन चोप्राचा आरोप
Pornography Case : राज कुंद्रा आपले बोल्ड व्हिडीओ शिल्पा शेट्टीला दाखवायचा आणि ते तिला पसंत पडायचे असा आरोप अभिनेत्री शर्लिन चोप्राने केला आहे.

Pornography Case : अभिनेत्री शर्लिन चोप्राने राज कुंद्रावर केलेल्या आरोपांच्या यादीत आता आणखी एक आरोपाची भर पडली आहे. राज कुंद्रा आपले बोल्ड व्हिडीओ हे अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दाखवायचा आणि ते व्हिडीओ शिल्पाला आवडायचे असा दावा शर्लिन चोप्राने केला आहे. शर्लिन चोप्राने एबीपी न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत हा दावा केला आहे.
शर्लिन चोप्राने सांगितलं की राज कुंद्राच्या आर्म्सप्राईम या कंपनीसाठी आपण इरॉटिक, सेमी न्यूड आणि न्यूड कंटेन्ट व्हिडीओ तयार करायचो आणि त्याच नावाने ते अॅपवर अपलोड करण्यात यायचे. आपले बोल्ड व्हिडीओ शिल्पा शेट्टीला दाखवत असल्याचं आणि ते तिला आवडत असल्याचं राज कुंद्राने आपल्याला सांगितलं होतं असंही शर्लिन चोप्राने सांगितलं. शिल्पा शेट्टीला आपले व्हिडीओ आवडतात हे ऐकल्यानंतर आपल्याला खूप आनंद झाला होता असंही शर्लिन चोप्राने सांगितलं.
राज कुंद्रावर अनेक अभिनेत्रींचा आरोप
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि व्यावसायिक राज कुंद्राला 14 दिवसांसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच, 28 जुलै रोजी न्यायालयानं याचा जामीन अर्जही फेटाळून लावला होता. राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक अभिनेत्रींकडून त्याच्यावर आरोप करण्यात आले आहेत. राज कुंद्रावर पॉर्न व्हिडीओ शूट करुन हॉटशॉटवर पब्लिश केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यांच्या अटकेनंतर अनेक अभिनेत्रींनी राज कुंद्राच्या या अॅपबाबत उघडपणे भाष्य केलं आहे. शर्लिन चोप्रानेही राज कुंद्रावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावला आहे.
राज कुंद्राच्या हॉटशॉट अॅपसाठी पॉर्न व्हिडीओ तयार करुन त्यावर स्ट्रीम करत असे. पॉर्नोग्राफी प्रकरणी शर्लिन चोप्रानं मुंबई क्राईम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलसमोर आपला जबाब नोंदवला आहे. त्यानं एप्रिल 2021 मध्ये राज कुंद्राविरोधात लैंगिक शोषणाचा आरोप करत एफआयआर दाखल केला होता.
शर्लिन चोप्रानं आरोप केला होता की, राज कुंद्रानं तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. ती त्याला विरोध करत होती, तरीही कुंद्रा तिचं ऐकत नव्हता. त्यानंतर शर्लिन चोप्राने त्याला धक्का दिला आणि त्याच्यापासून सुटका करुन घेत ती बाथरुममध्ये पळून गेली.
संबंधित बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
