Pooja Hegde : 'एक काळ असा होता जेव्हा चित्रपट मिळत नव्हते...'; पूजा हेगडेनं व्यक्त केल्या भावना
पूजानं (Pooja Hegde) नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिची स्ट्रगल स्टोरी सांगितली आहे.

Pooja Hegde : अभिनेत्री पूजा हेगडेनं (Pooja Hegde) बॉलिवूडसोबतच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. पूजा तिच्या स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. पूजानं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिची स्ट्रगल स्टोरी सांगितली आहे. या मुलाखतीमध्ये पूजानं काही काळ तिला काम मिळत नसल्याचं सांगितलं
जेव्हा पूजाला चित्रपटात काम मिळत नव्हतं
पूजानं मोहंजो दारो या चित्रपटामध्ये ह्रतिक रोशनसोबत काम करुन बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर तिनं हाउसफुल 4 या चित्रपटामध्ये काम केलं. त्यानंतर पूजानं दाक्षिणात्य चित्रपटासृष्टीत काम करण्यास सुरुवात केली. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत हिट चित्रपटांमध्ये पूजानं काम केलं. पण मुलाखतीमध्ये पूजानं सांगितलं की एक काळ असा होता की, तिला चित्रपटामध्ये काम नव्हतं मिळत. मुलाखतीमध्ये पूजा म्हणाली, 'माझ्याकडे सलग 6 चित्रपट होते ते माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम वर्ष आहे. परंतु माझ्याकडे एकही चित्रपट नव्हता, तो काळ हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात वाईट वर्ष होते.'
पुढे पूजा म्हणाली, 'मला ज्या भूमिका करायच्या होत्या, ते चित्रपट होऊ शकले नाहीत आणि मग एका तेलगू चित्रपटाने माझ्या करिअरला बूस्ट मिळाला.' पूजानं राधे श्याम, बीस्ट आणि आचार्य तीन बिग बजेट चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या सर्कस चित्रपटामध्ये पूजा ही रणवीर सिंहसोबत काम करणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच पूजा कभी ईद कभी दीवाली या सलमान खानच्या आगमी चित्रपटामध्ये देखील काम करणार आहे. पूजाच्या आगामी चित्रपटांची वाट तिचे चाहते उत्सुकतेने पाहात आहेत.
हेही वाचा:
- Cannes 2022 : कान्सच्या रेड कार्पेटवर जाण्याआधी पूजा हेगडेसोबत घडलं असं काही...; ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
- PHOTO : पूजा हेगडेनं वाढवले हार्ट बिट्स; व्हायरल फोटोंनी घातलाय धुमाकूळ
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
