Panghrun Movie : 'साहवेना अनुराग' ; ‘पांघरूण' चित्रपटातील गाणे प्रदर्शित
Panghrun Movie : 'साहवेना अनुराग' (Sahvena Anurag) हा गाणं प्रदर्शित झाले आहे.
Panghrun Movie : काकस्पर्श (Kaksparsh ), नटसम्राट (Natsamrat) अशा सर्वोत्कृष्ट कलाकृतीनंतर महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) आणि झी स्टुडिओज घेऊन येत असलेल्या 'पांघरूण' (panghrun) या चित्रपटातील 'अनोखी गाठ' आणि 'इलुसा हा देह' ही दोन सुरेल गाणी यापूर्वी प्रदर्शित झाली होती. या श्रवणीय गाण्यांना संगीतरसिकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या चित्रपटातील 'साहवेना अनुराग' (Sahvena Anurag) हे मंत्रमुग्ध करणारे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याला केतकी माटेगावकर हिचा सुमधुर आवाज लाभला असून या गाण्याचे बोल वैभव जोशी यांचे आहेत तर हितेश मोडक यांनी या गाण्याला संगीतबद्ध केले आहे.
झी स्टुडिओज आणि महेश मांजरेकर हे एक उत्तम समीकरण आहे आणि त्यातून नेहमीच एक अनोखा कलाविष्कार चित्रपटप्रेमींसाठी सादर होतो. अशीच सुंदर कलाकृती 'पांघरूण'च्या निमित्ताने पाहायला मिळणारा आहे. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, कोकणातील नयनरम्य निसर्गसौंदर्य आणि तिथे घडणारी अनोखी प्रेमकहाणी आपल्याला 'पांघरूण' मध्ये पाहायला मिळणार आहे. पुन्हा एक विलक्षण प्रेमकहाणी अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटातील 'साहवेना अनुराग' या गाण्याचे बोल थेट काळजाला भिडणारे आहेत. कला आणि प्रतिभेतून आलेला आवेश या गाण्यात चित्रित करण्यात आला आहे. नायिकेच्या मनातील भावना, घालमेल न बोलताही देहबोलीतून व्यक्त होत आहेत. हा सांगितिक खजिना प्रेक्षकांना नक्कीच भावेल.
अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले असून यात अमोल बावडेकर, गौरी इंगवले, रोहित फाळके, विद्याधर जोशी, सुरेखा तळवलकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सुमधुर संगीत, भावनिक कथानक यांमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा हा चित्रपट ४ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो' मध्ये गेल्यानं शैलेश लोढा ट्रोल; नेटकरी म्हणाले...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha