एक्स्प्लोर

Lochya Zala Re : सिद्धार्थ, अंकुश अन् वैदेही यांच्या ‘लोच्या झाला रे’ चित्रपटाचा धमाकेदार टीझर प्रदर्शित

Lochya Zala Re : 'लोच्या झाला रे' या चित्रपटाचे टीझर नुकताच  सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Lochya Zala Re : प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असलेला अंकुश चौधरी(ankush choudhary) , सिद्धार्थ जाधव (siddhartha jadhav), वैदेही परशुरामी (vaidehi parashurami) आणि सयाजी शिंदे यांचा 'लोच्या झाला रे' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. सुरेश जयराम यांच्या नाटकावर आधारित या चित्रपटाचे टीझर नुकतेच  सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला असून यात आपल्याला अंकुश, सिद्धार्थ व वैदेही यांच्यात चाललेला गोंधळ दिसून येत आहे. एकीकडे विजय पाटकर यांची जुगलबंदी तर दुसरीकडे सयाजी शिंदे व रेशम टीपणीस  यांचा रोमान्स पाहायला मिळत आहे. सगळ्यांचाच हा गोंधळ आणि पळापळ कशासाठी सुरु आहे, कोणाच्या आयुष्यात लोच्या झाला आहे. या सगळ्याचीच उत्तरे आपल्याला 4 फेब्रुवारीला मिळणार आहेत. 

'लोच्या झाला रे'चे  चित्रीकरण लंडनमध्ये झाले असून टीझरमध्ये अवघ्या लंडनची सफर घडत आहे. सुमारे एक महिना या चित्रपटाचे चित्रीकरण लंडनमध्ये पार पडले. तिथल्या सततच्या बदलत्या हवामानामुळे चित्रीकरणादरम्यान कलाकारांसह इतर टीमलाही विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते . कधी अवकाळी पाऊस तर कधी कडाक्याची थंडी यामुळे कलाकारांसोबत संपूर्ण टीमला अनेक कसरती कराव्या लागल्या. 

‘ल्योचा झाला रे’च्या लंडनमधील चित्रीकरणाच्या अनुभवाबाबत दिग्दर्शक पारितोष पेंटर म्हणतात, ‘’मला वैदेही आणि सिद्धार्थचे विशेष कौतुक करावेसे वाटते कारण लंडनमधील कडाक्याची थंडी पाहता, वैदेहीचा भूमिकेला अनुसरून असलेला पेहराव तेथील थंडीला अनुकूल नसल्याने तिला अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. तरी ब्लॅंकेटचा सहारा घेत तिने संपूर्ण शूटिंग उत्तमरित्या पार पाडले. सिद्धार्थचेही बरेच सीन्स हे शॉर्ट्समध्ये असल्याने त्यालाही थंडीचा सामना करावा लागला. मात्र कोणीही तक्रार केली नाही. या चित्रपटात कलाकारांनी जेवढी मेहनत घेतली आहे तेवढीच मेहनत पडद्या मागील सदस्यांनीही घेतली आहे म्हणूनच आमच्या संपूर्ण टीमने घेतलेली मेहनत यशस्वी होईल व  प्रेक्षकवर्ग या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देतील, अशी मला अपेक्षा आहे .  

'लोच्या झाला रे' या चित्रपटाचे दिग्दर्शन पारितोष पेंटर आणि रवी अधिकारी यांनी केले असून संजय मेमाणे यांनी छायाचित्रणाची धुरा सांभाळली आहे. नवीन चंद्रा, नितीन केणी, पारितोष पेंटर आणि शांताराम मनवे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर मंगेश रामचंद्र जगताप कार्यकारी निर्माता आहेत . लंडनमध्ये चित्रित झालेला हा चित्रपट मुंबई मुव्ही स्टुडिओ प्रस्तुत आयडिया दि एंटरटेनमेंट कंपनी आणि अभिनय मुंबई प्रोडक्शन अंतर्गत बनवण्यात आला असून वितरणाचे काम यूएफओ मुव्हीझने पाहिले आहे.

संबंधित बातम्या

Samantha  : नागा चैतन्यसोबतच्या घटस्फोटाबाबतची पोस्ट समंथाकडून डिलीट; दोघं पुन्हा एकत्र येणार?

The Kapil Sharma Show : 'द कपिल शर्मा शो' मध्ये गेल्यानं शैलेश लोढा ट्रोल; नेटकरी म्हणाले...

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव

व्हिडीओ

Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report
NCP Alliance : मित्रांनी ठेवलं दूर, काकांशी एकीचा सूर; कुणाला डोकेदुखी? Special Report
Thackeray Brother Alliance : बिगुल वाजलं तरी ठाकरे बंधूंच्या युतीचं नाही ठरलं? Special Report
Chandrapur Farmer :कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी? शेतकऱ्याचा धक्कादायक दावा Special Report
Navneet Rana : पक्ष की पती? नवनीत राणांची कुणाशी सहमती? भाजप राणांना झापणार की जपणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
मोदींच्या शिरपेचात आणखी एक आंतरराष्ट्रीय तुरा; इथियोपियाचा सर्वोच्च पुरस्कार ‘ग्रेट ऑनर निशान’ने सन्मानित
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
दिलासादायक! चार दिवसानंतर सोन्याच्या दरात घसरण, सध्या किती दर? पुढच्या काळात काय राहणार  स्थिती? 
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
टाटाकडून महिला टीम इंडियाचा सन्मान; संघातील प्रत्येक खेळाडूस कार गिफ्ट करत बहुमान
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
यल्लामा देवीची 3 दिवस यात्रा, देशभरातून हजारो तृतीयपंथी जमले; दागदागिन्यांचा शृंगार अन् मोठा उत्सव
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
पुणे, पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवारांशी बंद दाराआड चर्चा, तुषार कामठे काय म्हणाले?
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
सिक्सर किंग, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूची पत्नी निवारा केंद्रात; रेखाने लग्नाची आठवणही सांगितली
Prithviraj Chavan VIDEO: राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
राजकारण्यांना मुली पुरवण्याचं अमेरिकेतील एपस्टीन कांड; पृथ्वीराज चव्हाणांच्या हादरवणाऱ्या दाव्याने देशाचा पंतप्रधान बदलणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 डिसेंबर 2025 | मंगळवार
Embed widget