Nawazuddin Siddiqui : आरआरआर आणि KGF 2 च्या यशावर नवाजुद्दीन सिद्दीकीची रिअॅक्शन; म्हणाला, 'यामध्ये चित्रपट कुठंय?'
एका मुलाखतीमध्ये नवाजुद्दीन बिग बजेट चित्रपटांबद्दल मतं मांडलं आहे.
Nawazuddin Siddiqui : साध्या दाक्षिणात्य चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. आरआरआर (RRR) आणि केजीएफ चॅप्टर-2 (KGF2) हे चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहेत. अनेकांनी या चित्रपटाचे कौतुक केले. पण अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीनं मात्र या चित्रपटांबद्दल वेगळं मतं मांडलं आहे. एका मुलाखतीमध्ये नवाजुद्दीन अशा बिग बजेट चित्रपटांबद्दल मतं मांडलं आहे.
एका मुलाखतीमध्ये नवाजुद्दीनला 'मेन लीड ही संकल्पाना बददली आहे का?' असा प्रश्न विचारण्यात आला. याबाबत त्यानं सांगितलं की,'मला नाही वाटतं की चित्रटांमधील मेन लीडची संकल्पना बदलली आहे. मी मंटो या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. पण किती लोक हा चित्रपट पाहायला आले? मला वाटलं होतं की लोकांनी गेल्या दोन वर्षामध्ये वर्ल्ड सिनेमा देखील पाहिला असेल आणि त्यांच्यामध्ये काही बदल झाले असतील. पण अशा प्रकारचे चित्रपट सध्या हिट होत आहेत त्यामुळे वाटतं की, लोकांचे फक्त मनोरंजनच केलं पाहिजे. '
पुढे नवाजुद्दीन म्हणाला, 'असे बिग बजेट चित्रपट हे प्रेक्षकांना प्रभावित करतात. त्यामध्ये विमान पाण्यावर चालते तसेच मासे हवेत उडतात, असा व्हिज्युअल एक्सपीरियन्स असतो. मला ही असं पाहायला आवडतं पण यामध्ये चित्रपट कुठंय? जेव्हा तुम्ही CODA आणि किंग रिचर्ड यांसारखे चित्रपट ओटीटीवर पाहता. तेव्हा चांगला चित्रपट पाहायला मिळाला म्हणून देवाचे आभार मानता.'
नवाजुद्दीन सिद्दीकीचा लवकरच हिरोपंती-2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये तो नवाज लैला नावाची भूमिका साकारणार आहे.
हेही वाचा :