एक्स्प्लोर

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या

Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्यांचा घेतलेला आढावा.

TOP 10 Entertainment News : दिवसभरातील दहा महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या -

'थप्पड' प्रकरणाचा विल स्मिथच्या वैवाहिक जीवनावर परिणाम

काहीच दिवसांपूर्वी भव्य ऑस्कर सोहळा पार पडला. हा सोहळा पुरस्कारांपेक्षा अभिनेता विल स्मिथच्या ‘थप्पड’ प्रकरणामुळे जास्त चर्चेत आला होता. या प्रकरणामुळे ऑस्कर सोहळ्याला गालबोट लागलं होत. पत्नी जाडा पिंकेट-स्मिथ हिच्या आजारपणाची खिल्ली उडवल्याने संतापलेल्या विल स्मिथने होस्ट ख्रिस रॉकला जोरदार थप्पड लगावली होती. मात्र, आता या थप्पडचा परिणाम अभिनेत्याच्या वैवाहिक जीवनावरही दिसायला लागला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ज्या पत्नीसाठी विलने होस्टच्या कानाखाली लगावली, तीच आता विलची साथ सोडण्याच्या तयारीत आहे.

पहिल्याच दिवशी 'शेर शिवराज' हाऊसफुल!

दिग्पाल लांजेकरांचा 'शेर शिवराज' हा सिनेमा 22 एप्रिलला सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. पहिल्याच दिवशी अनेक सिनेमागृहांबाहेर हाऊसफुलचे बोर्ड झळकले आहेत. पहिल्या दिवशी या सिनेमाने 1.05 कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. 

आयुष्मान खुरानाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' दिवशी प्रदर्शित होणार 'अॅन अॅक्शन हिरो'

आयुष्मान खुरानाचा 'अॅन अॅक्शन हिरो' हा सिनेमा येत्या 2 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत. अनिरुद्ध अय्यर यांनी 'अॅन अॅक्शन हिरो' या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. 

बहुचर्चित 'इर्सल' चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रेक्षकांच्या भेटीला

'राजकारणात गुलालाशिवाय मज्याच नाय!!' अशी टॅगलाईन असलेल्या 'इर्सल' चित्रपटाचा फर्स्ट लुक अतिशय लक्षवेधी असून चित्रपटाचे हटके नाव आणि उत्कंठावर्धक पोस्टर यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता  शिगेला पोहचली आहे. 'इर्सल' चित्रपटाच्या पोस्टरमध्ये गुलालाची उधळण दिसते, त्यामध्ये एका व्यक्तीचा हात असून त्या हातात पिस्टल दिसत आहे.  'इर्सल' येत्या 3 जून 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. 

शिल्पा शेट्टीचं डिजिटल विश्वात पदार्पण

बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी याने नुकतीच त्याच्या कॉप ड्रामा सिरीजची घोषणा केली होती. रोहित शेट्टी Amazon Prime सोबत मिळून ‘इंडियन पोलीस फोर्स’ नावाची सिरीज बनवत आहे. या सिरीजमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा यात एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. आता रोहित शेट्टीच्या या सिरीजमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीची एण्ट्री झाली आहे.

कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2'चे नवे पोस्टर प्रदर्शित

'भूल भुलैया 2' या सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमात कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकतेच या सिनेमाचे नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. हा सिनेमा 22 मे 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

फराझ हैदर दिग्दर्शित 'मेरे देश की धरती' सिनेमाचा ट्रेलर आऊट

कार्निवल मोशन पिक्चर्सचा 'मेरे देश की धरती'.... देश बदल रहा है' हा हिंदी सिनेमा येत्या 6 मे ला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. दोन इंजिनिअर्स तरुण स्वत:ची नोकरी करत असताना, काहीतरी वेगळे करून दाखवण्याची उर्मी जपण्यासाठी कसे शेतकरी बनतात, याची हलकीफुलकी रंजक कथा 'मेरे देश की धरती' या सिनेमातून उलगडणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन फराझ हैदर यांनी केलं आहे. 

उत्सव रंगभूमीचा,  नवरसांचा! 'अहमदनगर महाकरंडक'चा महाअंतिम सोहळा ‘या’ दिवशी पार पडणार

हौशी रंगकर्मींच्या कलाविष्काराला प्रोत्साहन देणारी, नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देणारी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकीका स्पर्धा ' अहमदनगर महाकरंडक 2022,  उत्सव रंगभूमीचा,  नवरसांचा' ची महाअंतिम फेरी अहमदनगर येथील माऊली सभागृहात 26 ते 29 एप्रिल दरम्यान जल्लोषात रंगणार आहे.

शाहिद कपूरच्या 'जर्सी'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा 'जर्सी' सिनेमा नुकताच सिनेमागृहात प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पहिल्याच दिवशी या सिनेमाने चार कोटींची कमाई केली आहे. 

आयुष्याला सकारात्मक करणारा चित्रपट 'तिरसाट', ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

'अँटमगिरी' या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक प्रदीप टोणगे आणि मंगेश शेंडगे आता ‘तिरसाट’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. आयुष्याकडे सकारात्मकतेनं पाहण्याचा विचार या चित्रपटातून मांडण्यात आला असून, येत्या 20 मे ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaPankaja Munde : पंकजाताईंना पाहताच कुटुंबियांनी फोडला टाहो; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटलाCm Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री शिंदेंच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावरील बैठक संपन्नABP Majha Headlines : 05 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
Embed widget