![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sundar Amche Ghar : सासू-सुनेची जोडी, लावेल सगळ्यांना गोडी; गोष्टीची रंगत आता वाढणार
Sundar Amche Ghar : 'सुंदर आमचे घर' या मालिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे.
![Sundar Amche Ghar : सासू-सुनेची जोडी, लावेल सगळ्यांना गोडी; गोष्टीची रंगत आता वाढणार Sundar Amche Ghar marathi serial Mother in law pair Lavelle sweet to everyone The story will get more colorful now Sundar Amche Ghar : सासू-सुनेची जोडी, लावेल सगळ्यांना गोडी; गोष्टीची रंगत आता वाढणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/23/124efb23f608855e2acd38c8ec1f2ccc_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sundar Amche Ghar : 'सासूसुनेचं प्रेम, जिवलग मैत्रिणींसारखं सेम', असं म्हणत सुरू झालेली 'सुंदर आमचे घर' (Sundar Amche Ghar) ही मालिका आता एका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. काव्या आता लग्न होऊन राजपाटील यांची सून होऊन घरी येणार आहे. सुभद्रा आणि काव्या यांच्यामधलं म्हणजेच सासू-सुनेमधलं मैत्रीचं नातं कसं फुलतं, हे आता प्रेक्षकांना मालिकेत बघायला मिळणार आहे.
जुने आणि आधुनिक वैचारिक भेद यांमुळे घरात काय घडतं, हे 'सुंदर आमचे घर' या मालिकेत पाहायला मिळतं आहे. पुरुषांचं वर्चस्व असलेल्या राजपाटील कुटुंबात स्त्रियांचं महत्त्व पटवून देण्यात काव्या म्हणजेच मालिकेची नायिका आता यशस्वी होते का, त्यासाठी ती काय करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
काव्या लग्न करून राजपाटील यांच्या घरात येण्याआधीच तिची सुभद्राशी म्हणजेच तिच्या सासूशी चांगली गट्टी जमली आहे. काव्याचं तिच्या सासूशी जमलेलं चांगलं सूत काव्याची आजेसासू म्हणजे नारायणी बिघडवू शकते का किंवा बिघडवण्यासाठी काय करते, हे बघणं आता मनोरंजनात्मक ठरणार आहे. या सासूसुनेच्या जोडीची मैत्री नारायणी होऊ देते की नाही, हे या मालिकेत बघायला मिळणार आहे. ही मालिका सासू आणि सून यांच्यामध्ये असणारं मैत्रीचं नातं अधोरेखित करणार आहे. तीन पिढ्यांतल्या सुना म्हणजे काव्या, सुभद्रा आणि नारायणी एकाच घरात वावरत असताना काय गमतीजमती घडतात, हे पाहणंही मनोरंजक ठरणार आहे. आता खऱ्या अर्थानी सासूसुनेच्या मैत्रीचा प्रवास प्रेक्षकांना बघता येणार आहे.
View this post on Instagram
तीन वेगवेगळ्या पिढ्यांतल्या स्त्रिया एका घरात एकत्र नांदू लागल्यानंतर एकाच गोष्टीकडे बघण्याचे तीन वेगवेगळे दृष्टिकोण आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. आता नारायणी आणि काव्या यांची वैचारिक जुगलबंदी मालिकेत रंगणार आहे. त्याचबरोबर नारायणी काव्याला नातसून म्हणून स्वीकारणार का, रितेश आणि काव्याचं लग्न नारायणी टिकू देणार का, काव्याशी नारायणी कशी वागणार, काव्या राजपाटील कुटुंबाच्या विचारसरणीला बदलू शकेल का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना मिळणार आहेत.
संबंधित बातम्या
Man Udu Udu Zhala : 'मन उडू उडू झालं' मालिकेत नवं वळण, आईसाठी दीपू-इंद्रा करणार प्रेमाचा त्याग?
Majhi Tujhi Reshimgath : ‘माझी तुझी रेशीमगाठ’मध्ये नवी एण्ट्री होणार, समीर आणि शेफालीचं नातं आता तरी जुळणार?
Sher Shivraj : पहिल्याच दिवशी 'शेर शिवराज' हाऊसफुल! सिनेमागृहांत घुमतोय ‘जय शिवराय’चा जयघोष
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)