धर्म मानवतेसाठी हानिकारक, म्हणून मी त्यावर "साहसी" सिनेमा काढेन, कान्स सोहळ्यात नसरुद्दीन शाह बेधडकच बोलले
Naseeruddin Shah : नसरुद्दीने शाह यांनी बॉलीवूडमध्ये धर्मावर साहसी सिनेमा काढणार असल्याचं बेधडक वक्तव्य केलं आहे. दरम्यान त्यांच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
![धर्म मानवतेसाठी हानिकारक, म्हणून मी त्यावर Naseeruddin Shah said he wants to do a courageous film on religion Entertainment Bollywood latest update detail marathi news धर्म मानवतेसाठी हानिकारक, म्हणून मी त्यावर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/19/c79c99762735188fe964394a4b3d308e1716140568552720_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Naseeruddin Shah : बॉलीवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) सामाजिक आणि राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर त्यांची स्पष्ट मतं कायमच व्यक्त करत असतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि राजकारणाचा सिनेमांवर होणाऱ्या परिणामांबाबतही अनेकदा त्यांनी उघडपणे आपली मतं व्यक्त केली आहे. नुकतच नसरुद्दीन शाह यांनी 77 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अभिनेत्री आणि त्यांच्या पत्नी रत्ना पाठक यांच्यासोबत हजेरी लावली. यावेळी एका मुलाखतीदरम्यान त्यांनी धर्मावर बेधडक वक्तव्य केलं आहे.
आयाधी देखील ब्रूट इंडियाच्या मुलाखतीमध्ये त्यांना विचारण्यात आलं होतं की, कोणत्याही समकालीन सामाजिक विषयावर चित्रपट बनवण्यासाठी एखादा विषय निवडायचा असेल तर ते कोणता निवडतील? या प्रश्नावरही नसरुद्दीन शाह यांनी बेधडक वक्तव्य केलं होतं. त्यावर त्यांनी म्हटलं होतं की, यासाठी मी धर्म निवडेन. मला असं वाटतं की धर्मावर साहसी सिनेमे बनवायला हवेत, कारण याच गोष्टीचा आपण नेहमी विचार करतो.
धर्म मानवतेला हानिकारक - नसरुद्दीन शाह
दरम्यान नसरुद्दीन शाह यांनी पुढे म्हटलं की, माझ्या मते, मानवतेसाठी धर्म ही सर्वात हानिकारक गोष्ट आहे आणि म्हणूनच मला यावर एक चित्रपट बनवायचा आहे. जसा मी अनेक वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये बनवला होता, ज्याचे नाव खुदा के लिए होते. जो मंथन इतकाच महत्त्वाचा चित्रपट होता. काही लोक या विषयावर चित्रपट बनवण्याचा प्रयत्नही करत असतील. त्यांची संख्या देखील हळूहळू वाढू शकते. पण यावर लगेच काही सांगणं योग्य ठरणार नाही. कारण हा विषय कोणीतरी वेगळ्या पद्धतीने दाखवयला हवा.
कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'मंथन'चे स्क्रीनिंग
श्याम बेनेगल दिग्दर्शित 'मंथन' (1976) च्या स्क्रीनिंगला नसीरुद्दीन आणि त्याची पत्नी रत्ना पाठक शाह देखील उपस्थित होते. या चित्रपटाची कान्स क्लासिक्स विभागात निवड झाली होती. या चित्रपटात गिरीश कर्नाड, स्मिता पाटील आणि अमरीश पुरी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. प्रतिक बब्बर देखील त्याच्या दिवंगत आईच्या (स्मिता पाटील) क्लासिक चित्रपटाचा प्रीमियर पाहण्यासाठी तिथे होता.
ही बातमी वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)