एक्स्प्लोर

Anant Jog : 'मी तिच्या दोन सिनेमात काम केलं पण तिने पैसेच दिले नाहीत', अनंत जोग यांनी सांगितला क्षितीचा मजेशीर किस्सा 

Anant Jog :  अभिनेते अनंत जोग यांनी त्यांची मुलगी आणि अभिनेत्री क्षिती जोग हिचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. तसेच यावेळी त्यांनी उज्वला जोग यांच्यासोबतच्या नात्यावरही भाष्य केलं आहे.

Anant Jog : मराठी सिनेसृष्टीतले खलनायक म्हणून अनंत जोग (Anant Jog) यांची खलनायक म्हणून विशेष ओळख आहे. आतापर्यंत त्यांनी बॉलीवूडसह अनेक मराठी सिनेमांमध्येही कामं केली आहेत. पण त्यांची खलनायिकेची भूमिका विशेष प्रसिद्ध आहे. दरम्यान अनंत जोग यांची मुलगी देखील याच सिनेसृष्टीत कार्यरत आहे. क्षिती जोग (Kshitee Jog) आणि अभिनेते अनंत जोग यांची मुलगी. क्षिती ही सध्या निर्माती म्हणूनही काम पाहते. नुकतच अनंत जोग यांनी क्षितीचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे. 

क्षितीने झिम्मा सिनेमापासून निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. तसेच तिच्या झिम्मा सिनेमामध्ये अनंत जोग यांनी देखील भूमिका साकारली आहे. यामध्ये अनंत जोग यांनी निर्मिती सावंत यांच्या पतीची भूमिका केली आहे. पण क्षितीच्या दोन सिनेमांत काम करुनही तिने त्याचे मला पैसे दिले नाही, असा मिश्किल आरोपही अनंत जोग यांनी यावेळी केला आहे. अनंत जोग यांनी नुकतच सुलेखा तळवळकर यांच्या दिल के करीबला मुलाखत दिली.

अनंत जोग यांनी काय म्हटलं?

क्षितीने या क्षेत्रात यायचं ठरवलं तेव्हा तुमची भावना काय होती? यावर बोलताना अनंत जोग यांनी म्हटलं की, आम्हाला खूप छान वाटलं. विनय आपटेनी एका एकांकिका स्पर्धेमध्ये तिचं काम पाहिलं आणि तिचं नाव त्याने कांचन अधिकारीला सुचवलं. तेव्हा कांचनचा मला फोन आला. अनंत तुझी मुलगी दिसायला सुंदर आहे का? ती माझ्या मालिकेत मुख्य भूमिका करेल का? अशी तिची सुरुवात झाली. आता ती निर्माती देखील झालीये. तिने मला तिच्या दोन तीन सिनेमात कामही दिलं, पण त्याचे पैसे नाही दिले, मग काय उपयोग. मुलगी असली म्हणून काय झालं,मला दोन वेळेला जेवायला लागतचं की, असा मिश्किल अनुभव अनंत जोग यांनी सांगितला. 

उज्वला जोग यांच्यासोबतचं नातं

अनंत जोग आणि अभिनेत्री उज्वला जोग यांचा घटस्फोट झाला असला तरीही आजही आमचं मैत्रीचं नात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावर त्यांनी म्हटलं की, जरी आमचा घटस्फोट झाला असला तरीही आमचं नातं हे,मैत्रीचं आहे. तिने कधी बोंबलाचं कालवण केलं की मला फोन करते. पण आजही आम्ही फोनवर बोलतो. भेटायला जातो.

ही बातमी वाचा : 

Maharashtrachi Hasyajatra : 'क्रिकेट काय शिकवतं?' आरसीबी क्वॉलिफाय झाल्यावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत 

महत्त्वाच्या बातम्या

TV Actress Palak Purswani: बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न
बिग बॉस फेम अन् प्रसिद्ध अभिनेत्रीने बांधली साताजन्माची गाठ, पलकचा नवरा आहे तरी कोण? महादेवाच्या मूर्तिसमोर केलं लग्न
100 कोटींचा टप्पा गाठणारे महिला-केंद्रित चित्रपट; आलिया भट्टचे दोन सिनेमे यादीत
100 कोटींचा टप्पा गाठणारे महिला-केंद्रित चित्रपट; आलिया भट्टचे दोन सिनेमे यादीत
बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला;2 महिन्यांनंतर नशीब फिरलं, OTT वर येताच 'या' फिल्मचा टॉप 10 मध्ये धुमाकूळ
बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला;2 महिन्यांनंतर नशीब फिरलं, OTT वर येताच 'या' फिल्मचा टॉप 10 मध्ये धुमाकूळ
Marathi Actor On Viral Vaidu More Video: 'काकी तुम्ही..' फेम व्हायरल वैदूच्या व्हिडिओवरून लोकप्रिय मराठी अभिनेत्याची नाराजी; स्पष्टच म्हणाले ..
'काकी तुम्ही..' फेम व्हायरल वैदूच्या व्हिडिओवरून लोकप्रिय मराठी अभिनेत्याची नाराजी; स्पष्टच म्हणाले ..

व्हिडीओ

Ramdev Baba : राम देवबाबांच्या वक्तव्यावरून वाद; काँग्रेस, मुस्लिम धर्मगुरू आक्रमक | Special Report
CJP Sonam Wangchuk Strike : 'रँचो'चं उपोषण सरकारचं कोणतं लक्षण? | ABP Majha Special Report
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणींची 92 लाख नावं वगळली, सरकार आता जागले | ABP Majha Special Report
Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : होर्मुझमधून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, इराणकडून अमेरिकन लष्करी तळांवर हल्ले सुरुच
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जायचं असल्यास आम्हाला 20 टक्के टोल द्यावा लागणार, ट्रम्प यांची घोषणा  
Mutual Fund : 2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
2026 मध्ये लार्ज कॅप, स्मॉल कॅप की मिड कॅप, कोणत्या गटातील म्युच्युअल फंडांकडून सर्वाधिक परतावा? जाणून घ्या
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
चेंबूर स्कुल बसवरील झाड दुर्घटना, उद्यान व रस्ते विभागाला क्लीन चिट; कंत्राटदारास 5 लाखांचा दंड, नव्या SOP चे आदेश
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
Embed widget