Dootha, The Village First Look : नागा चैतन्य आणि आर्य करणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण; 'दुथा' अन् 'द विलेज' चा फर्स्ट लूक रिलीज
अॅमेझॉन या ओटीटी प्लॅटफॉर्मनं नुकतीच त्यांच्या नव्या प्रोजेक्ट्सची माहिती दिली.
Dootha, The Village First Look : सध्या अनेक सेलिब्रिटी ओटीटीवर पदार्पण करत आहेत. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) तसेच अभिनेता आर्य (Aryan) हे दोघे देखील लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर डेब्यू करणार आहेत. अॅमेझॉन या ओटीटी प्लॅटफॉर्मनं नुकतीच त्यांच्या नव्या प्रोजेक्ट्सची घोषणा केली आहे.
अभिनेता नागा चैतन्य 'दुथा' या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन विक्रम के कुमार यांनी केलं आहे. हॉरर थ्रिलर असणाऱ्या या वेब सीरिजमध्ये पार्वती थिरुवोथु, प्रिया भवानी शंकर, प्राची देसाई आणि थारुन भास्कर धास्यम हे कलाकार देखील या सीरिजमध्ये महत्वाची काम करणार आहेत. दुथा या वेब सीरिजबद्दल नागा चैतन्यनं सांगितलं, 'मला हॉरर चित्रपटांची भिती वाटते. मी पाच मिनीट देखील हॉरर चित्रपट पाहू शकत नाही. पण जेव्हा मला दुथाच्या दिग्दर्शकांनी संपर्क साधला तेव्हा मला असं वाटलं की मला ते सर्व चॅनलाइज करायते आहे जे मला आधीपासून माहित आहे. '
View this post on Instagram
'द विलेज'मध्ये आर्य साकारणार महत्वाची भूमिका
तमिळ चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणारा अभिनेता आर्य हा 'द विलेज' नावाच्या सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण करत आहे. या सीरिजचा पहिला लूक देखील रिलीज झाला आहे. आर्यनं एका मुलाखतीमध्ये या सीरिजबद्दल सांगितलं. तो म्हणाला, 'ही सीरिज समान्य सीरिज नाहिये. ही सीरिज शूट करताना आम्हाला फार मज्जा आली. ' द विलेजमध्ये दिव्या पिल्लई, आझिया, आदुकलम नरेन, थलाइवासल विजय, मुथुकुमार, कलाई रानी, जॉर्ज एम, जॉन कोकेन, अर्जुन चिदंबरम, पूजा, जयप्रकाश, पीएन सनी या कलाकरांनी देखील महत्वाची भूमिका साकारली आहे.
View this post on Instagram
हेही वाचा :
- Rashmika Mandanna : ‘जर्सी’च नाही, संजय लीला भन्साळींनाही दिलाय नकार! रश्मिकाने नाकारलेयत ‘हे’ ब्लॉकबस्टर चित्रपट!
- Lagan : ‘प्रेम निभावता आलं तर ते जिंकतं’, अभिनेत्री स्मिता तांबेच्या ‘लगन’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
- Ajay Devgn VS Kiccha Sudeep : 'हिंदी राष्ट्रभाषा नसेल तर तुमचे चित्रपट डब करून का रिलीज करता? किच्चा सुदीपच्या वक्तव्यावर अजय देवगणचे प्रत्युत्तर