एक्स्प्लोर

Megha Dhade Supports Mahesh Kothare: '...तर उद्धव सेनेला इंगळ्या डसल्या'; सुप्रसिद्ध अभिनेत्रीनं जाहीरपणे घेतली महेश कोठारेंची बाजू, उर्मिला मातोंडकर, महेश मांजरेकरांचाही केला उल्लेख

Megha Dhade Supports Mahesh Kothare: मराठी अभिनेत्री मेघा धाडेनं महेश कोठारेंची बाजू घेतली आहे. यासंदर्भात तिनं सोशल मीडियावर एक पोस्टही केली आहे.  

Megha Dhade Supports Mahesh Kothare: गेल्या काही दिवसांपासून मराठी अभिनेते (Marathi Actor), निर्माते महेश कोठारे (Mahesh Kothare) भलतेच चर्चेत आहेत. त्यांच्या एका कृतीमुळे अनेकजण त्यांना पाठींबा देत आहेत. तर, अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. यासाठी निमित्त ठरलं, काही दिवसांपूर्वी महेश कोठारेंनी (Mahesh Kothare Supports BJP) भाजपला (BJP) दिलेला जाहीर पाठींबा. दिवाळीनिमित्त भारतीय जनता पार्टीनं एक कार्यक्रम आयोजित केलेला, त्या महेश कोठारे सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी मी मोदी भक्त असून, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपचंच कमळ फुलणार असल्याचं वक्तव्य केलेलं. त्यानंतर अनेकांनी महेश कोठारेंवर टीका केली. अगदी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, शिवसेना ठाकरे गटाच्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनीही महेश कोठारेंवर टीकेची तोफ डागली. पण, अशातच आता मराठी अभिनेत्री मेघा धाडेनं (Marathi Actress Megha Dhade) महेश कोठारेंची बाजू घेतली आहे. यासंदर्भात तिनं सोशल मीडियावर एक पोस्टही केली आहे.  

मेघा धाडे सोशल मीडियावर पोस्ट करुन काय म्हणाली? 

मेघा धाडे सोशल मीडियावर पोस्ट करुन म्हणाली की, "अभिनेत्री उर्मिला मातोंडकरनं उद्धव सेना जॉइन केली होती, तेव्हा कोणत्याही भाजप प्रवक्त्यानं तिच्या व्यक्तिस्वातंत्र्यावर आक्षेप घेतला नव्हता! सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकरनं तर मनसेच्या तिकिटावर लोकसभा लढवली होती, तरी कोणी आक्षेप घेतला नाही! परंतु महेश कोठारेंनी मोदींची तारीफ केली की, उद्धव सेनेला इंगळ्या डसल्या! कोठारेंवर टीकेची झोड उठवली गेली! त्यांच्या मराठीपणावर देखील शंका घेण्यात आली!"

"हे असे झाले कारण कोठारे जे बोलले ते मनापासून बोलले कोणत्या तिकीटाच्या लालसेपोटी, कोणाचे पाकीट मिळवण्यासाठी ते असे बोलले नाही एक सामान्य मुंबईकरांची जी भावना आहे जो मुंबईकर आधी रस्त्यावर धक्के खायचा तो आता मेट्रोत गार वाऱ्यात वेगाने प्रवास. करतोय जो मुंबईकर आधी ट्रॅफिक मध्ये अडकायचा आता तो अटल सेतूवरून सुसाट धावतोय त्या मुंबईकरांच्या भावनांचे प्रगटीकरण कोठारेंच्या भाषणात झाले आणि म्हणूनच उद्धव सेनेच्या पायाखालची जमीन सरकली! आणि हे सत्यात देखील उतरणार आहे.", असं मेघा धाडे म्हणाली आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Megha Dhade (@meghadhade)

यासोबत मेघा धाडेनं एक कॅप्शनही लिहिलंय. ती म्हणाली की, "महेश सर तुम्ही जे बोललात ते तुमचं मत होतं , जे तुम्ही मनापासून व्यक्त केलं , आम्हा सगळ्यांना तुमच्या मताचा शंभर टक्के आदर आहे . बाकी टीका करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा कारण कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहना छोडो बेकार की बातो को, हमे तो सच के साथ ही हैना..." तसेच, मेघा धाडेनं या पोस्टमध्ये महेश कोठारेंना टॅगही केलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Mahesh Kothare & Urmila Kothare: मी मोदीभक्त म्हणणाऱ्या महेश कोठारेंवर किशोरी पेडणेकरांचा गंभीर आरोप, म्हणाले, 'अपघात प्रकरणात सुनबाईंना वाचवायला...'

महत्त्वाच्या बातम्या

AIच्या मदतीने साकारलेला मराठी चित्रपट; ‘त्यांची वारी’चा अभिनव प्रयोग; YouTubeवर पाहता येणार
AIच्या मदतीने साकारलेला मराठी चित्रपट; ‘त्यांची वारी’चा अभिनव प्रयोग; YouTubeवर पाहता येणार
15 ऑगस्टच्या सुट्टीला काय पहाल? ‘शेरशाह’ ते ‘उरी’, देशभक्तीचा जोश वाढवणाऱ्या 7 चित्रपटांची लिस्ट
15 ऑगस्टच्या सुट्टीला काय पहाल? ‘शेरशाह’ ते ‘उरी’, देशभक्तीचा जोश वाढवणाऱ्या 7 चित्रपटांची लिस्ट
Sushant Singh Rajput: 'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
MHJ Fame Onkar Bhojane in Manjar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
वडिलांचं छत्र हरपताच मेस्सीची इमोशनल पोस्ट; म्हणाला, 'मी फक्त फुटबॉल खेळायचो, आता मला नाही वाटत तुमच्याशिवाय जास्त काळ खेळू शकेन, पण..' लिओ म्हणत रोनाल्डोच्या धीर देणाऱ्या कमेंटनं लक्ष वेधलं
Embed widget