एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lata Mangeshkar I गानकोकिळा लता मंगेशकर रुग्णालयातून घरी
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
मुंबई : गानकोकिळा लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
एबीपी माझाला लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर आहे. सोमवारी रात्री उशिरा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. लता मंगेशकर यांना व्हायरल इनफेक्शन झालं आहे, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. चिंता करण्याची गरज नाही असं उषा मंगेशकर यांनी माहिती दिली होती. डॉक्टरांनी सध्या आराम करण्याचा सल्ला दिला असून 2 दिवसात डिस्चार्ज देण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले होते. गायिका आशा भोसले यांनी देखील रुग्णालयात जाऊन लता मंगेशकर यांची भेट घेतली होती. दरम्यान, आता लता मंगेशकर यांनी रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
सोशल मीडियावर सध्या लता मंगेशकर यांच्या प्रकृतीविषयी चर्चा सुरु आहेत. त्यालाही मंगेशकर कुटुंबीयांनी प्रतिसाद देत काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगितले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement