Kangana Ranaut : वाढदिवसाला कंगना वैष्णोदेवीच्या चरणी; खास पद्धतीनं बर्थ-डे सेलिब्रेशन
वाढिवसानिमित्त कंगनानं (Kangana Ranaut) वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं.
Kangana Ranaut : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रनौतनं (Kangana Ranaut) खास पद्धतीनं तिचा वाढदिवस साजरा केला. कंगनाचा काल (23 मार्च) 35 वा वाढदिवस होता. तिचा जन्म 23 मार्च 1987 रोजी भम्बाला येथे झाला. कंगनाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या चाहत्यांनी आणि अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर तिला शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त कंगनानं वैष्णोदेवीचं दर्शन घेतलं.
कंगनानं पोस्ट नुकतीच एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिनं लिहिले, 'माझ्या वाढदिवसानिमित्त मी भगवती श्री वैष्णोदेवी जी यांचे दर्शन घेतले. त्यांच्या आणि माझ्या आई- वडीलांच्या आशिर्वादानं मी या वर्षाची सुरूवात करत आहे. मला शुभेच्छा दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. ' यावेळी कंगनानं गोल्डन इयरिंग्स, निळा आणि लाल रंगाचा ड्रेस आणि पिवळ्या रंगाची ओढणी असा लूक केला होता. कंगनानं वैष्णोदेवीचे दर्शन घेतल्यानंतर कंगनानं भैरव बाबा यांचे देखील दर्शन घेतले. कंगनानं शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिच्यासोबत बहिण रंगोली रनौत देखील दिसत आहे.
View this post on Instagram
सध्या कंगना एकता कपूरच्या लॉक-अप या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या शोचे कंगना सूत्रसंचालनं करते. धाकड, तेजस, सीता, टीकू वेड्स शेरू आणि इमली या आगामी चित्रपटांमध्ये कंगना प्रमुख भूमिका साकारणार आहे.
संबंधित बातम्या
- TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
- Salman Khan : सलमान खानला तातडीचा दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाचा नकार
- The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' सिनेमा पाहण्यासाठी गेलेल्या महिलेकडून रिक्षा चालकाने भाडं घेतलं नाही, विवेक अग्निहोत्रीने मानले आभार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha