एक्स्प्लोर

Jhimma Movie : 'झिम्मा'चे रेकॉर्डब्रेक अर्धशतक! पन्नास दिवसात बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई

Jhimma : झिम्मा या मराठी चित्रपटाने पन्नास दिवसात कोट्यवधींची कमाई केली आहे.

Jhimma : लॉकडाऊननंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन सुपरहिट ठरलेला मराठी चित्रपट म्हणजे 'झिम्मा' (Jhimma) . १९ नोव्हेंबरला २०२१मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांबरोबरच समीक्षकांनीही पसंती दर्शवली असून सिनेसृष्टीतूनही 'झिम्मा' ला सकारात्मक प्रतिक्रिया मिळत आहेत. सोशल मीडियावरही या चित्रपटाची जोरदार चर्चा अद्यापही सुरुच आहे. 'झिम्मा'चे नुकतेच पन्नास दिवस पूर्ण झाले असूनही या चित्रपटाने हाऊसफुल्लचा बोर्ड कायम ठेवला आहे . खरंतर कोरोना निर्बंधांमुळे सर्व थिएटर पन्नास टक्के क्षमतेने सुरु करण्यात आले आहेत. त्यातही बॅालिवूडचे अनेक चित्रपट शर्यतीत असतानाही उत्तम कथालेखन, दिग्दर्शन आणि तगड्या स्टारकास्टच्या बळावर 'झिम्मा'ने अर्धशतकाचा टप्पा गाठला आहे . इतकेच नाही तर बॅाक्स ॲाफिसवरही 50 दिवसात तब्बल 14 करोडची कमाई केली आहे. 50 व्या दिवशी झिम्मा 80 हुन अधिक सिनेमागृहांमधे आहे हा एक रेकॉर्ड आहे. 

'झिम्मा' हा चित्रपट फक्त मुंबई, पुणे सारख्या मोठ्या शहरात नाही तर हा चित्रपट महाराष्ट्रातील प्रत्येक गावोगावी पोहोचला जेथे ग्रामीण स्त्रियांनी मागण्या करून या चित्रपटाला त्यांच्या गावातील थिएटर मध्ये आणायला भाग पाडले.  तसेच यावेळी असा काही  ग्रामीण महिला वर्ग सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला ज्यांनी 'झिम्मा' च्या निमित्ताने  पहिल्यांदा  थिएटरमध्ये जाउन त्यांचा पहिला सिनेमा पाहिला. हे सर्व पाहून अतिशय आनंद होतो की ग्रामीण लोक आणी विशेषतः महिला वर्ग सुद्धा आज मराठी चित्रपटाला इतका भरभरून पाठींबा देत आहेत. 

हेमंत ढोमे दिग्दर्शित 'चलचित्र कंपनी' प्रस्तुत 'अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट' आणि 'क्रेझी फ्यू फिल्म्स' निर्मित 'झिम्मा' चित्रपटात सिद्धार्थ चांदेकर, निर्मिती सावंत, सुहास जोशी, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सोनाली, सायली संजीव, मृण्मयी गोडबोले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले असून छायाचित्रीकरण संजय मेमाणे यांनी केले आहे. क्षिती जोग यांच्यासोबत स्वाती खोपकर, अजिंक्य ढमाळ, विराज गवस, उर्फी काझमी, सनी शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

‘झिम्मा'ला मिळणाऱ्या प्रचंड लोकप्रियेबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ‘सर्वप्रथम 'झिम्मा'ला मिळत असणाऱ्या प्रेमाबद्दल मी सर्व मराठी प्रेक्षकांचे आभार मानतो. तसेच बर्‍याच वर्षांनी एखादा मराठी चित्रपट इतके दिवस थिएटर मध्ये टिकून राहिला असून लॉकडाऊननंतर सलग पन्नास दिवस महाराष्ट्रभर थिएटर मध्ये चालणारा 'झिम्मा' पहिला चित्रपट ठरला आहे. याचा निश्चितच खूप आनंद व अभिमान वाटत आहे. या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रेक्षकांचे मराठी चित्रपटसृष्टीवर आणि चांगल्या विषयांवर किती प्रेम आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले. तसेच प्रेक्षकांकडून अनेक भावनिक प्रतिक्रिया येत आहेत. आपल्या कलाकृतीला मिळणार्या या सकारात्मक प्रतिक्रयेमुळे एक समाधान आहे आणि या सगळ्याचे श्रेय ‘झिम्मा’च्या टीमला आणि साहजिकच प्रेक्षकांना जाते.’

हे ही वाचा

Deepika Padukone, Ranveer Singh : रणवीर-दीपिकाचं मुंबईतील आलिशान घर; कोट्यवधींची किंमत अन् बरचं काही

Tanishaa Mukerji Marriage: जोडव्यांच्या फोटोमुळे लग्नाच्या चर्चा; पाहा काय म्हणाली काजोलची बहिण तनीषा..

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget