Deepika Padukone, Ranveer Singh : रणवीर-दीपिकाचं मुंबईतील आलिशान घर; कोट्यवधींची किंमत अन् बरचं काही
Deepika Padukone Ranveer Singh : रणवीर आणि दीपिकाच्या घराची किंमत माहितेय?

Deepika Padukone Ranveer Singh Home : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh)ही नेहमी चर्चेत असणारी जोडी आहे. बाजीराव मस्तानी, रामलिला या चित्रपटांमधील दीपिका आणि रणवीरच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. या दोघांच्या लाईफस्टाईलबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमी उत्सुक असतात. मुंबईत एका आलिशन घरात रणवीर आणि दीपिका राहतात. जाणून घेऊयात या दोघांच्या घराबाबत
दीपिका आणि रणवीरचं आलिशान घर हे मुंबईमधील वरळी येथे आहे. त्यांच्या घराचं नाव ‘Beaumonde Towers’ असं आहे. रिपोर्टनुसार दीपिका आणि रणवीर हे 4 BHK च्या लग्झरी फ्लॅटमध्ये राहतात. या फ्लॅटमध्ये अनेक अत्याधुनिक सुविधा आहेत. या फ्लॅटची किंमत 16 कोटी रूपये आहे.
View this post on Instagram
काही दिवसांपूर्वी रणवीर आणि दीपिकाचा 83 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात रणवीरने कपिल देव यांची भूमिका साकरली आहे. चित्रपटातील रणवीरच्या अभिनयाचे अनेक जण कौतुक करत आहेत. या चित्रपटात दीपिकाने कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारली आहे. दीपिका पादूकोणचा लवकरच पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तसेच 'द इंटर्न' या आगामी चित्रपटामध्ये दीपिका प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. अमिताभ बच्चन देखील या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार आहेत.
संबंधित बातम्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
