(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raghav Juyal dating : शक्ती मोहन नव्हे राघव जुयालला स्वीडनच्या मुलीनं केलं क्लीन बोल्ड? सोशल मीडियावर चर्चेला उधाण
Raghav Juyal Is Dating A Swedish Girl: प्रसिद्ध डान्सर आणि नृत्य दिग्दर्शक राघव जुयाल एका स्वीडीश मुलीला डेट करत असल्याची चर्चा सुरु आहे.
Raghav Juyal Is Dating A Swedish girl : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध डान्स रिएलिटी शो डान्स दिवाने 3 (Dance DIwane 3) चा होस्ट राघव जुयाल (Raghav Juyal) शोमधील त्याच्या मस्तीमुळे अनेकांची मनं जिंकतो. त्याचे अनेक फॅन्सही आहेत. त्याचा डान्स विशेषत: स्लोमोशन फार प्रसिद्ध आहे. पण आता तो एका स्वीडीश मुलीला डेट (Swedish Girl) करत असल्याची चर्चा सुरु आहे.
संबधित मुलीचं नाव सारा अर्रहुसिस (Sara Arrhusius) असून तिचं भारतात येणं जाणं सुरुच असतं. दरम्यान राघव आणि ती एकमेंकाना 2018 पासून डेट करत असल्याचंही समोर येत आहे. साराचं भारतातील एका कंपनीशी कामासंबधी नातं असल्यानं ती सतत भारतात ये-जा करत असते. सूत्रंच्या माहितीनुसार सारा आणि राघव एका ट्रेकवर एकमेंकाना भेटले होते. त्याच दरम्यान दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.
दोघेही लाँग डिस्टेन्स रिलेशनशिपमध्ये
दरम्यान राघव भारतात आणि सारा स्वीडनला राहत असल्याने दोघांनाही लाँग डिस्टेन्स रिलेशनशिपमध्ये रहावे लागत आहे. सारा नुकतीच डान्स प्लस 6 (Dance India Dance 6) च्या सेटवर देखील राघवला भेटण्यासाठी आली होती. तसंच दोघेही नोव्हेंबरमध्ये काही खास मित्र-मैत्रींनीसोबत गोव्याला (Goa Vacation) सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. दरम्यान या साऱ्याबाबत काही अधिकृत माहिती नसली तरी अनेक चर्चांना मात्र उधान आलं आहे.
हे ही वाचा
- टीव्हीवर पाहिलं अन् म्हणाली हाच होणार माझा नवरा, जिंतेद्र जोशीच्या पत्नीचा भन्नाट किस्सा
- Sara Ali Khan : सिक्यूरिटी गार्डच्या कृत्यामुळं सारा अली खानला मनस्ताप; तात्काळ मागितली माफी; व्हिडीओ व्हायरल
- Atrangi Re Song Chaka Chak Out : Sara Ali Khan च्या 'अतरंगी रे' सिनेमातील 'चका चक' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha