IIFA Awards 2023 : ठरलं! 'या' दिवशी पार पडणार आयफा पुरस्कार 2023, यंदाही अबू धाबीमध्ये रंगणार सोहळा
IIFA Awards 2023 : 'आयफा' पुरस्कार 2023 फेब्रुवारी महिन्यात पार पडणार आहे. पुढच्या वर्षीचा पुरस्कार सोहळा अबुधाबीच्या यास बेटावर पार पडणार आहे.
IIFA Awards 2023 : 'इंटरनॅशनल इंडियन फिल्म अकादमी पुरस्कार' (The International Indian Film Academy) म्हणजेच आयफा पुरस्कार 2023 (IIFA 2023) सोहळ्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. पुढच्या वर्षीचा म्हणजेच IIFA Awards 2023 हा पुरस्कार सोहळ्याच्या तारखा जाहिर (IIFA 2023 Dates Announced) झाल्या आहेत. 'आयफा' पुरस्कार 2023 फेब्रुवारी महिन्यात पार पडणार आहे. पुढच्या वर्षीचा पुरस्कार सोहळा अबुधाबीच्या यास बेटावर पार पडणार आहे. IIFA Awards 2023 हा पुरस्कार सोहळा 10 आणि 11 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार सोहळा अबुधाबी येथे पार पडणार आहे.
या पुरस्कार सोहळ्याला अभिनेता सलमान खान (Salman Khan), करण जोहर (Karann Johar), वरुण धवन ( Varun Dhawan), कृती सेनन (Kriti Sanon) या कलाकारांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. IIFA च्या उपाध्यक्षा, नोरीन खान यांनी आयफा पुरस्कार 2023 च्या तारखेसंदर्भात घोषणा करत सांगितलं आहे की, 'गेल्या वर्षी पार पडलेला आयफा पुरस्कार सोहळ्याचा वर्ष एक आश्चर्यकारक अनुभव होता. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी अबु धाबीमध्ये या पुरस्काराचं आयोजन करण्यात येत आहे. यंदाही अबूधाबीमध्ये उत्साहात या पुरस्कार सोहळा पार पडेल, ही आशा आहे.'
Mark your calendars to save the date for the most awaited night of the year!
— IIFA (@IIFA) September 30, 2022
Book your tickets now to witness the most magnificent night of glitz and entertainment at https://t.co/ncejMYQLQ7 #IIFA2023 #YasIsland #InAbuDhabi@yasisland @VisitAbuDhabi pic.twitter.com/LUQBcSkgGD
अबू धाबी येथी पर्यटन महासंचालक सालेह मोहम्मद अल-गझिरी यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, 'पुन्हा एकदा अबू धाबीमध्ये आयफा पुरस्काराचं आयोजन होणं ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. याद्वारे आम्हाला अबू धाबी येथील संस्कृती, नाईट लाईफ जगासमोर आणण्याची संधी आहे. फेब्रुवारीत होणारा हा पुरस्कार सोहळ्यात अतिशय उत्साहात पार पडेल.'
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Bigg Boss Love stories : ‘बिग बॉस मिलाई जोडी’, ‘बिग बॉस’च्या घरातच जमल्या ‘या’ कलाकारांच्या जोड्या!
- Bigg Boss 16 Live Streaming : सलमानच्या ‘बिग बॉस 16’चा ग्रँड प्रीमिअर! जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार?