Happy Birthday Anushka Sharma : यशस्वी अभिनेत्री, निर्माती ते ‘वामिका’ची आई, ‘असा’ होता अनुष्का शर्माचा प्रवास...
Anushka Sharma Birthday : अनुष्का फिल्मी कुटुंबातील नसून, तिने स्वबळावर चित्रपटांमध्ये यश मिळवले. अनुष्काने हे यश मिळवण्यासाठी खूप संघर्ष केला आहे.
Anushka Sharma Birthday : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. आज म्हणजेच 1 मे रोजी अनुष्का तिचा 35 वा वाढदिवस साजरा करत आहे. अनुष्काने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. लेक वामिकाच्या जन्मानंतर ती चित्रपटांपासून दूर होती. पण, आता ती पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाली आहे. अनुष्का ही सेवानिवृत्त कर्नल अजय कुमार शर्मा आणि आशिमा शर्मा यांची मुलगी आहे.
अनुष्काचे शालेय शिक्षण बंगळुरू येथील आर्मी स्कूलमध्ये झाले असून, अनुष्काचा भाऊ कर्णेश शर्मा मर्चंट नेव्हीमध्ये काम करतो. तिने माउंट कार्मेल कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे. कला शाखेची पदवी घेतल्यानंतर अनुष्काने अर्थशास्त्रात एमए केले आहे. अनुष्का शर्माच्या करिअरची पहिली पसंती पत्रकारिता होती. पण, संधी मिळाली आणि अनुष्काचं मनोरंजन विश्वात पदार्पण झालं.
अशी मिळाली पहिली संधी!
दिवंगत फॅशन डिझायनर वेंडेल रॉड्रिग्स यांनी अनुष्काला एका मॉलमध्ये काही समान खरेदी करताना पाहिलं. त्यांनी तिला मॉडेलिंग करण्याविषयी विचारलं, ज्यावर तिने लगेच होकारही दिला. इथूनच तिचे मॉडेलिंग करिअर सुरू झाले. मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी ती मुंबईला आली. त्यानंतर अनुष्काने 2008मध्ये 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटातून पदार्पण केले. मात्र, तिचा हा चित्रपट फ्लॉप झाला. या चित्रपटानंतर, ती यशराज बॅनरच्या ‘बॅंड बाजा बारात’ आणि ‘जब तक है जान’ या चित्रपटांमध्ये दिसली आणि या दोन्ही चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर तिने कधीच मागे वळून पहिले नाही.
अनुष्का आणि तिचा भाऊ कर्णेश यांनी मिळून एक प्रोडक्शन हाऊस देखील सुरु केले आहे. अभिनेत्रीने आता त्यातून काढता पाय घेतला असला, तरी तिने अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.
विराटसोबत बांधली लग्नगाठ
अनुष्का आणि विराटने त्यांचे नाते बरेच दिवस मीडिया आणि चाहत्यांपासून लपवून ठेवले होते. दोन वर्षे डेटिंग केल्यानंतर त्यांनी लग्न केले आणि लोकांना त्यांच्या नात्याबद्दल सांगितले. आता या जोडीला ‘वामिका’ नावाची गोंडस मुलगी देखील आहे. वामिकाच्या जन्मानंतर अनुष्काने काही काळ चित्रपटांतून ब्रेक देखील घेतला होता.
एका चित्रपटासाठी आकारते ‘इतके’ मानधन!
अनुष्का फिल्मी कुटुंबातील नसून, तिने स्वबळावर चित्रपटांमध्ये यश मिळवले. अनुष्काने हे यश मिळवण्यासाठी खूप संघर्ष केला आहे. चित्रपटांमध्ये यश मिळाल्यावर अनुष्काने तिची फीही वाढवली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनुष्का शर्मा एका चित्रपटासाठी 7 ते 10 कोटी रुपये घेते. चित्रपटांव्यतिरिक्त अनुष्का शर्मा अनेक जाहिरात चित्रपटांमध्ये काम करते. जाहिरातींसाठी चित्रपट आणि जाहिरातींसाठी ती 10-12 लाख रुपये आकारते.
हेही वाचा :