The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स'ने सिनेमागृहात 50 दिवस केले पूर्ण; जगभरात बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ
The Kashmir Files : 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा प्रदर्शित होऊन 50 दिवस पूर्ण झाले आहेत.
The Kashmir Files 50 days box office collection : 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या सिनेमाने सिनेमागृहात 50 दिवस पूर्ण केले आहेत. विवेक अग्निहोत्रींनी (Vivek Agnihotri) सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. जगभरात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.
'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा ब्लॉगबस्टर ठरला आहे. विशेष म्हणजे दिवसागणिक या सिनेमाची कमाई वाढत आहे. विवेक अग्निहोत्रीने 'द कश्मीर फाइल्स' सिनेमाचे पोस्टर शेअर करत लिहिले आहे,"आज 'द कश्मीर फाइल्स' सिनेमाने सिनेमागृहात प्रदर्शित होऊन 50 दिवस पूर्ण केले आहेत. आजही हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे".
View this post on Instagram
'द कश्मीर फाइल्स' या सिनेमाने जगभरात बॉक्स ऑफिसवर 339.49 कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा 11 मार्च 2022 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. अवघ्या 14 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला 'द कश्मीर फाइल्स' हा सिनेमा नव्वदच्या दशकात काश्मीर खोऱ्यातील पंडितांच्या हत्येच्या आणि अमानुष अत्याचारांच्या घटनांचे वर्णन करतो. या सिनेमात पल्लवी जोशी, दर्शन कुमार, मिथुन चक्रवर्ती, चिन्मय मांडलेकर आणि अनुपम खेर मुख्य भूमिकेत आहेत. लवकरच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.
संबंधित बातम्या
Shreyas Talpade : सिता आणि द्रौपदीच्या रोलमुळे आत्मविश्वास वाढला, अभिनेता श्रेयस तळपदेने उलगडला प्रवास
Rakesh Maria Biopic : माजी पोलीस आयुक्त राकेश मारियांचा बायोपिक येणार! रोहित शेट्टी करणार दिग्दर्शन
Heropanti 2 Box Office Collection : टायगर श्रॉफच्या 'हीरोपंती 2' सिनेमाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी केली कोट्यवधींची कमाई
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)