Entertainment News Live Updates 25 February : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE

Background
RRR : हॉलिवूडच्या पुरस्कार सोहळ्यात राजामौलींच्या 'आरआरआर'चा बोलबाला
HCA Film Awards 2023 RRR Movie : एसएस राजामौलींच्या (SS Rajamouli) 'आरआरआर' (RRR) या सिनेमाचा हॉलिवूडमध्येही बोलबाला पाहायला मिळत आहे. 'ऑस्कर 2023'च्या नामांकन यादीत समावेश झालेल्या या सिनेमाने आता आपल्या नावे आणखी एक विक्रम केला आहे. हॉलिवूडच्या मानाच्या 'हॉलिवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कार सोहळ्या'त (Hollywood Critics Association) 'आरआरआर'ने बाजी मारली आहे.
View this post on Instagram
Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल
Nawazuddhin Siddiqui : बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) पत्नीने म्हणजेच आलियाने (Aaliya Siddhiqui) अभिनेत्याविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. आलियाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
View this post on Instagram
Divya Bharti Birth Anniversary : बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या दिव्या भारती!
Divya Bharti : बॉलिवूड अभिनेत्री दिव्या भारती (Divya Bharti) यांची आज 49 वी जयंती आहे. त्यांनी वयाच्या 19 व्या वर्षापर्यंत 21 सिनेमांत काम करत आपल्या अभिनयाने चाहत्यांना घायाळ केलं होतं. त्यांची गणना बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत केली जाते.
Selfiee : बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला खिलाडी कुमारचा 'सेल्फी'
Selfiee Box Office Collection Day 1 : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि इमरान हाशमीचा (Emraan Hashmi) 'सेल्फी' (Selfiee) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. गेल्या काही दिवसांपासून चाहते या सिनेमाची प्रतीक्षा करत होते. पण रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा सिनेमा जादू दाखवण्यात कमी पडला आहे.
Collections in national chains for #Selfiee at 11 pm:
— Box Office Worldwide (@BOWorldwide) February 24, 2023
Pvr: 62 lacs
Inox: 43 lacs
Cinepolis: 23 lacs
Total: 1.28 crores
Film might struggle to cross 3 cr nett all India! https://t.co/9TKyXk8ouS pic.twitter.com/yaLmfozYXE
Gautami Patil : नादच खुळा! पाच वर्षांच्या चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा भन्नाट शो
Gautami Patil : महाराष्ट्रासह देशभरात सध्या नृत्यांगणा गौतमी पाटीलचं (Gautami Patil) नाव चर्चेत आहे. तिच्या नृत्यावर आक्षेप घेतला जात असला तरी तिची आणि तिच्या नृत्याची चांगलीच क्रेझ पाहायला मिळत आहे. नुकतचं साताऱ्यात पाच वर्षांच्या चिमुकल्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या वडिलांनी थेट गौतमी पाटीलचा शो आयोजित केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
