Entertainment News Live Updates 01 March : टीव्हीपासून ते बॉलिवूडपर्यंत... मनोरंजन विश्वात काय घडतंय जाणून घ्या एका क्लिकवर!
Entertainment Live : मनोरंजन विश्वात सध्या काय नवं घडतंय, याची देखील सर्वांनाच उत्सुकता असतेच. या माध्यमातून अशाच काही चटपटीत बातम्या आम्ही सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहचवणार आहोत.
LIVE

Background
Tiger 3 Viral Video: सलमानच्या 'टायगर 3' च्या सेटवरील व्हिडीओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'इमरान हाश्मी...'
Tiger 3 Viral Video : बॉलिवूडमधीस प्रसिद्ध अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या टायगर-3 (Tiger 3) या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटामध्ये अभिनेता इमरान हाश्मी देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये इमरान हाश्मी (Emraan Hashmi) हा डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे.
Farhan Akhtar: फरहान अख्तरवर भडकले नेटकरी; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या
Farhan Akhtar: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) हा जगभरातील विविध शहरांमध्ये आपल्या बँडसोबत परफॉर्म करतो. काही दिवसांपूर्वी 'फरहान लाईव्ह' या फरहानच्या बँडच्या लाईव्ह प्रोग्रॅमचे आयोजन ऑस्ट्रेलियामधील सिडनी आणि मेलबर्न येथे करण्यात आले होते. पण ऑस्ट्रेलियामधील हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. फरहानने याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन माहिती दिली.
फरहानची ही पोस्ट पाहून काही नेटकरी भडकले. त्याच्या या पोस्टला काही युझर्सनं कमेंट केली. एका नेटकऱ्यानं फरहानच्या पोस्टला कमेंट केली, 'आमचे पैसे परत दे.' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'आम्हाला रिफंड कुठे मिळेल?'
View this post on Instagram
Shiv Thakarey: शिव ठाकरेची खास पोस्ट; वडिलांसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला, 'वचन देतो...'
Shiv Thakarey : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस-16' (Bigg Boss 16) मुळे शिव ठाकरेला (Shiv Thakarey) विशेष लोकप्रियता मिळाली. बिग बॉस-16 चा विजेता एमसी स्टॅन ठरला. पण शिव ठाकरेने मात्र बिग बॉस-16 मधून प्रेक्षकांच्या भेटीस येऊन चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं. शिव ठाकरेने मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनमध्ये देखील सहभाग घेतला होता. या सीझनचा तो विजेता ठरला होता. हिंदी बिग बॉसनंतर आता शिवच्या आगामी प्रोजेक्ट्सची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नुकतीच शिवने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. त्याच्या या पोस्टने अनेकांचे लक्ष वेधले.
Oscar 2023: ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात होणार 'नाटू नाटू' वर परफॉर्मन्स; 'हे' कलाकार करणार परफॉर्म
Oscar 2023 : ऑस्कर (Oscar) हा पुरस्कार मनोरंजनक्षेत्रातील मनाचा पुरस्कार मानला जातो. ऑस्कर 2023 (Oscar 2023) पुरस्कार सोहळ्याचं नामांकन मिळालेल्या चित्रपटांची यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली. यामधील बेस्ट ओरिजिनल साँग कॅटेगिरीमध्ये आरआरआर (RRR) या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला नामांकन मिळालं आहे. आता ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात नाटू नाटू गाण्यावर गायक राहुल सिप्लिगंज (Rahul Sipligunj) आणि काला भैरव (Kaala Bhairava) हे दोन कलाकार परफॉर्म करणार आहेत.
Rahul Sipligunj and Kaala Bhairava. “Naatu Naatu." LIVE at the 95th Oscars.
— The Academy (@TheAcademy) February 28, 2023
Tune into ABC to watch the Oscars LIVE on Sunday, March 12th at 8e/5p! #Oscars95 pic.twitter.com/8FC7gJQbJs
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
