Dharamveer : आनंद दिघेंच्या पोस्टरला दुधाचा अभिषेक, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला 'धर्मवीर' चा पहिला खास शो
ठाण्यातील व्हीव्हीयाना मॉल येथे या चित्रपटाचा पहिला खास शो आयोजित करण्यात आला.
![Dharamveer : आनंद दिघेंच्या पोस्टरला दुधाचा अभिषेक, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला 'धर्मवीर' चा पहिला खास शो Dharamveer movie first show thane anand dighe eknath shinde Dharamveer : आनंद दिघेंच्या पोस्टरला दुधाचा अभिषेक, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडला 'धर्मवीर' चा पहिला खास शो](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/05/13/dd686f8108f5736c6f24e63668e9b2c0_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Dharamveer : बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित धर्मवीर (Dharamveer) मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट आज (13 मे) रसिकांच्या भेटीला आला आहे. ठाण्यातील व्हीव्हीयाना मॉल येथे या चित्रपटाचा पहिला खास शो आयोजित करण्यात आला. या खास शोसाठी नगरविकासमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपस्थित होते. पहिल्या शोआधी दिवंगत आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक घालण्यात आला. या खास शोसाठी चित्रपटातील कलाकारांनीही हजेरी लावली.
पहिल्या शोला अनेक प्रेक्षकांनी उपस्थिती लावली. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, 'आनंद दिघे यांची आठवण येत नाही असा एकही क्षण जात नाही. त्यांचं प्रेरणदायी कार्य महाराष्ट्रानं पाहिलं आहे.'
प्रसाद ओक म्हणाला, ' विद्याधर भट्टे यांनी सर्व कलाकारांचा मेक-अप उत्तम प्रकारे केला. या चित्रपटाच्या लेखन दिग्दर्शनाचं शिवधनुष्य प्रविण तरडेनं पेललं आहे. मंगेश देसाईनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्याला झी-स्टूडिओजची साथ मिळाली. आज चित्रपट रिलीज झाला आहे. सकाळच्या शोपासूनचे आजचे सर्वच शो जवळपास हाऊस फूल झाले आहेत. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी काय होईल याची आम्ही सर्वजण उत्सुकतेने वाट पाहात आहोत.'
ट्रेलरला मिळाली प्रेक्षकांची पसंती
नुकतीच प्रसाद ओकनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेल्या व्ह्यूजबाबत सांगितलं. ‘सोशल मीडियावर चर्चा फक्त धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनपटाच्या ट्रेलरचीच. केवळ 24 तासांमध्ये ‘धर्मवीर, मुक्काम पोष्ट ठाणे’ चित्रपटाच्या ट्रेलरला मिळालेत 60 लाख व्ह्यूज. या प्रचंड प्रेमासाठी प्रेक्षकांचे लाख लाख आभार! धगधगत्या अग्निकुंडाची चरित्रगाथा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी Book My Show वरुन तिकीट बुक करा’, अशी पोस्ट शेअर करत प्रसाद ओकने चाहत्यांचे आभार मानले आहेत.
संबंधित बातम्या
- Dharmaveer : आनंद दिघे 'झुकेंगा नही साला' असे होते : उद्धव ठाकरे
- Dharmveer : आनंद दिघेंसारखा नेता पुन्हा होणे नाही : उद्धव ठाकरे
- Dharmaveer Trailer Launch : ‘आनंद दिघे हेच खरे दबंग’, ‘धर्मवीर’च्या ट्रेलर लाँचला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह सलमान खानची विशेष उपस्थिती!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)