Dharmaveer : आनंद दिघे 'झुकेंगा नही साला' असे होते : उद्धव ठाकरे
Dharmaveer : 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे.
Dharmaveer : 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर लॉंच झाला आहे. ट्रेलर लॉंचच्या या सोहळ्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सहकुटुंब हजर होते. तसेच अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि सलमान खान यांनी देखील विशेष उपस्थिती लावली. दरम्यान उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. उद्धव ठाकरे म्हणाले, 'आनंद दिघे हे 'झुकेंगा नही साला' असे होते.
उद्धव ठाकरे एक किस्सा सांगत म्हणाले, आनंद दिघेंवर बाळासाहेब बऱ्याचदा रागवायचे. आनंद दिघे लोकांना 11 ची वेळ देत असत. पण ते कामात खूप व्यस्त असत. त्यामुळे ते जेव्हा लोकांना भेटायला जात तेव्हा 11 वाजलेले असत. बाळासाहेब वेळ पाळणारे होते. बाळासाहेबांनी आनंद दिघेंना 11 ची वेळ दिल्यावर दिघे साहेब 2 वाजता यायचे. त्यामुळे बाळासाहेब त्यांच्यावर चिडायचे.
View this post on Instagram
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले,"आनंद दिघे 50 वर्ष जगले. पण त्यांनी रात्रंदिवस काम केलं आहे. म्हणजे त्यांचं वय 100 वर्ष झालं. 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' असं या सिनेमाचं नाव आहे. त्यापुढे ठाणेकरांचं ह्रदय' असं असायला हवं होतं. आनंद दिघे यांच्यासारखा माणूस पुन्हा होणे नाही". धर्मवीर मु.पो. ठाणे हा सिनेमा 13 मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
संबंधित बातम्या