Raju Srivastava : कॉमेडियन राजू श्रीवास्तव व्हेंटिलेटरवर; सहा दिवसांनंतरही प्रकृती नाजूक
रिपोर्टनुसार, राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची प्रकृती सध्या नाजूक आहे.
Raju Srivastava : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांची वर्कआऊट करताना हृदयविकाराचा झटका आला होता. बुधवारी (10 ऑगस्ट) सकाळी व्यायाम करत असताना ते ट्रेड मिलवर पडले. यावेळी त्यांना तत्काळ एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. रिपोर्टनुसार, राजू श्रीवास्तव यांची प्रकृती सध्या नाजूक आहे. त्यांना एम्स रुग्णालयातील आयसीयू डिपार्टमेंटमधील व्हेंटिलेटवर ठेवण्यात आलं आहे.
राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबानं शुक्रवारी एक इंन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितलं होतं की, राजू श्रीवास्तव यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. राजू श्रीवास्तव यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया पार पडली होती. काही दिवसांपूर्वी राजू यांचा भाऊ दीपू श्रीवास्तव यांनी त्यांच्या एमआरआय रिपोर्टबद्दल माहिती दिली. दीपू यांनी सांगितले की, राजूच्या मेंदूतील काही नसा दबल्या आहेत. त्या ठीक करण्यासाठी डॉक्टर त्यांचे पूर्ण प्रयत्न करत आहेत.
राजू श्रीवास्तव हे त्यांच्या विनोदी शैलीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या कार्यक्रमामधून ते प्रेक्षकांच्या भेटीस आले. या कार्यक्रमामधील त्यांच्या परफॉर्मन्सचं अनेकांनी कौतुक देखील केलं. ‘द किंग ऑफ कॉमेडी’ असंही राजू श्रीवास्तव यांना म्हणलं जातं. तसेच त्यांच्या ‘गजोधर भैय्या’ या भूमिकेला देखील प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.
View this post on Instagram
मैंने प्यार किया आणि बाजीगर या चित्रपटांमध्ये राजू श्रीवास्तव यांनी काम केलं. तसेच 'बिग बॉस 3', 'नच बलिए' आणि 'कॉमेडी नाइट्स विद कपिल' या कार्यक्रमामध्ये देखील राजू यांनी सहभाग घेतला होता. राजू यांनी करिअरची सुरुवात स्टेज शोमधून केली. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये राजू यांनी काम केलं. राजू यांच्या कॉमिक टायमिंगला आणि विनोदांना प्रेक्षकांची पसंती मिळते. राजू यांचा चाहता वर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर देखील राजू अॅक्टिव्ह असतात.
वाचा इतर बातम्या :