Waltair Veerayya: 'वॉलटेर वीरय्या' चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; चिरंजीवींच्या चित्रपटानं पार केला 100 कोटींचा टप्पा
आता 'वॉलटेर वीरय्या' (Waltair Veerayya) या चित्रपटानं 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. जाणून घेऊयात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
Waltair Veerayya Box Office Collection: साऊथ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता चिरंजीवी (Chiranjeevi), अभिनेत्री श्रुती हासन (Shruti Haasan) आणि अभिनेते रवी तेजा (Ravi Teja) यांचा 'वॉलटेर वीरय्या' (Waltair Veerayya) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाला सध्या प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. या चित्रपटानं रिलीज होताच दोन दिवसांमध्ये जवळपास 50 कोटींची कमाई केली. आता या चित्रपटानं 100 कोटींचा टप्पा पार केला आहे. 'वॉलटेर वीरय्या' सोबत रिलीज झालेला 'वीरा सिम्हा रेड्डी' (Veera Simha Reddy) हा चित्रपट मात्र प्रेक्षकांची पसंती मिळवू शकला नाही.
जाणून घेऊयात या चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन...
'वॉलटेर वीरय्या' हा चित्रपट 13 जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. के.एस. रवींद्र यांनी 'वॉलटेर वीरय्या' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. या चित्रपटानं रिलीज झाल्यानंतर पहिल्या दिवशी 29.6 कोटींची कमाई केली तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 19.8 कोटी कमावले. तसेच तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं 20 कोटी कमाई केली आहे. आता या चित्रपटाला रिलीज होऊन नऊ दिवस झाले आहेत. एका वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, नऊ दिवसात या चित्रपटानं 132 कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटातील चिरंजीवी यांच्या अॅक्शन, स्टाईल आणि डायलॉग्सला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
'वॉलटेर वीरय्या' कथा?
'वॉलटेर वीरय्या' या चित्रपटात चिरंजीवी यांनी डॉनची भूमिका साकारली आहे. महापालिका आयुक्त एसीपी विक्रम सागर (रवी तेजा यांनी साकारलेले) शहरात आल्यावर या डॉनला त्याची पावर कमी होऊ शकते, असे वाटते. या चित्रपटातील अॅक्शन सिन्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. चिरंजीवी यांनी काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या मेकिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये चित्रपटाची संपूर्ण टीम दिसत आहे.
View this post on Instagram
'या' कलाकारांनी साकारली प्रमुख भूमिका
'वॉलटेर वीरय्या' या चित्रपटात चिरंजीवी यांच्यासोबतच रवी तेजा, प्रकाश राज, श्रुती हासन आणि कॅथरीन ट्रसा यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. चित्रपटातील कलाकरांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे.
महत्वाच्या इतर बातम्या: