एक्स्प्लोर

बीएमडल्ब्लू कार लाकडाच्या कंटनेरला धडकली; भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू, 2 जखमी

सांगली येथील कार (एमएच ०४ ईजी ७५००) काही कामानिमित्त लातूरला आली होती. काम आटोपल्यानंतर शिवली येथे जेवण केल्यानंतर सहकाऱ्याला सोडण्यासाठी ही कार औशाकडे येत होती.

लातूर: जिल्ह्यातील औसा शहराजवळील औसा-तुळजापूर (Latur) महामार्गावर शुक्रवारी रात्री भीषण अपघाताची (Accident) घटना घडलीय. भरधाव बीएमडब्ल्यू कारने लाकडाची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोला मागील बाजूने धडक दिली. या घटनेत कारमधील 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. महामार्गावर शुक्रवारी रात्री 10.15 वाजता तीन वाहनांचा विचित्र भीषण अपघात झाला. भरधाव बीएमडब्ल्यू कारने ट्रक आणि कंटेनरला जोराची धडक दिली. यात कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. 

सांगली येथील कार (एमएच 04 ईजी 7500) काही कामानिमित्त लातूरला आली होती. काम आटोपल्यानंतर शिवली येथे जेवण केल्यानंतर सहकाऱ्याला सोडण्यासाठी ही कार औशाकडे येत होती. औशानजीक एका हॉटेलसमोर पुढे चाललेल्या लाकडाने भरलेल्या ट्रकला (एमएच 25 यू 0522) आणि एका कंटेनरला (एमएच 12 एफसी 7642) पाठीमागून कारने धडक दिली. त्यानंतर लाकडी ट्रक शंभर फूट पुढे जाऊन उलटला, तर कार पूर्णपणे चक्काचूर होऊन रस्त्यालगतच्या खड्ड्यात कोसळली. अपघातात मृत्यू झालेले तिघे हे औसा तालुक्यातील बोरगाव (न.) येथील रहिवासी आहेत. चालक धनराज काशीनाथ जाधव (४९, रा. सांगली), आबासाहेब साळुंके (३६), शुभम शेषेराव पाटील (२६), किसन रामलिंग साळुंके (४९, तिघेही रा. बोरगाव) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अपघातात जयहिंद विश्वास जाधव (30, रा. औसा) आणि विनायक श्रीकांत हालदर (२८, रा. सांगली) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सांगली येथील धनराज जाधव हे व्यापारी होते. बोरगाव येथील तरुणांच्या मदतीने ते औसा तालुक्यासह जिल्ह्यात व्यवसायाचे जाळे निर्माण करीत होते.

दरम्यान, घटनेची माहिती कळताच औसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य करून जखमींना रुग्णालयात हलवले. दरम्यान, अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

कंटेनरच्या धडकेत कामगारांचा मृत्यू

संभाजीनगर जिल्ह्यात समृद्धी महामार्गावरील नाथनगर (वडखा) शिवारात दुभाजकाच्या क्रैश बॅरिअर प्लेट बदलताना सुसाट कंटेनरने कामाचे साहित्य घेऊन उभ्या असलेल्या सर्व्हिस ट्रकला धडक दिली. अतिशय वेगामुळे ट्रकच्या आडोशाला जेवणासाठी बसलेल्या तीन कामगारांना चिरडून कंटेनर पुढील जेसीबीवर आदळला. यात चिरडले गेलेल्या तिन्ही कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. शुक्रवारी दुपारी 1.30 वाजता हा अपघात घडला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Latur : लातूर हादरले, दोन अल्पवयीन चुलत भाऊ बेपत्ता, एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू
लातूर हादरले, दोन अल्पवयीन चुलत भाऊ बेपत्ता, एकाचा मृतदेह सापडला, दुसऱ्याचा शोध सुरू
जिल्हाप्रमुख हटवा, शिवसेना वाचवा, निलंग्यात आमदार मंगेश कुडाळकरांसमोच शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी उफाळली 
जिल्हाप्रमुख हटवा, शिवसेना वाचवा, निलंग्यात आमदार मंगेश कुडाळकरांसमोच शिवसेना शिंदे गटातील अंतर्गत गटबाजी उफाळली 
25 IAS Officers Transfer Of Maharashtra: मुंबईपासून, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, संभाजीनगरपर्यंत...राज्यातील 25 आयएएस अधिकाऱ्यांची एकाच दिवशी बदली, पाहा संपूर्ण यादी!
मुंबईपासून, पुणे, नागपूर, सोलापूर, कोल्हापूरपर्यंत...राज्यातील 25 IAS अधिकाऱ्यांची एकाच दिवशी बदली, पाहा संपूर्ण यादी!
Latur ZP Election : लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
लातूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता; भाजपच्या उषाताई पाटील अध्यक्ष, राष्ट्रवादीच्या दयानंद सुरवसे उपाध्यक्ष
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tanvi Kolte : बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
Tanvi Kolte : कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Embed widget