Struggler Saala : पुन्हा तेच सगळं.... पुन्हा हसा... मज्जा करा; 'स्ट्रगलर साला 3'चा पहिला एपिसोड आऊट
Struggler Saala : 'स्ट्रगलर साला' ही वेबसीरिज अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आता या वेबसीरिजचा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
![Struggler Saala : पुन्हा तेच सगळं.... पुन्हा हसा... मज्जा करा; 'स्ट्रगलर साला 3'चा पहिला एपिसोड आऊट The first episode of Struggler Saala 3 is out Struggler Saala : पुन्हा तेच सगळं.... पुन्हा हसा... मज्जा करा; 'स्ट्रगलर साला 3'चा पहिला एपिसोड आऊट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/08/06/3fe7fab940e628344005cff1d82bcc541659806471_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Struggler Saala : अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली युट्यूब वरील वेबसिरीज म्हणजे 'स्ट्रगलर साला' (Struggler Saala). कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण आणि संतोष जुवेकर या मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांच्या सहज विनोदी अभिनयाने बहरलेली स्ट्रगलर साला' ही वेब सिरीज आहे. या वेबसीरिजचे दोन्ही सीझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. त्यामुळे प्रेक्षक या वेबसीरिजच्या तिसऱ्या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. आता या बहुचर्चित सीरिजच्या तिसऱ्या सीझनचा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
दिग्दर्शक विजू माने यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या
आणि त्यांचं दिग्दर्शन असलेल्या या वेब सिरीजला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. मराठी चित्रपट सृष्टीतील महेश मांजरेकर, सुबोध भावे, प्रियदर्शन जाधव अशा विविध दिग्गज कलाकारांचा सीरिजच्या विविध भागांमध्ये आपल्याला गेस्ट अपियरन्स पाहायला मिळतो आणि त्याचमुळे ही सिरीज प्रेक्षकांसाठी आणखी मनोरंजक होते.
View this post on Instagram
अभिनयाच्या क्षेत्रात आपलं नशीब आजमावायला आलेल्या तीन तरुण मित्रांच्या 'स्ट्रगल' काळातले किस्से, त्यांच्यातली भांडणं, मानापमान, एकमेकांवरच्या कुरघोड्या अशा सर्व गोष्टी आपल्याला अतिशय मनोरंजक पद्धतीने यात पाहायला मिळतात. आजच्या तरुणांना आवडतील असे रोजच्या बोलण्यातले संवाद या वेब सिरिजला तरुणांच्या पसंतीस उतरवतात.
आत्तापर्यंत या वेब सीरिजचे दोन सीझन प्रदर्शित झालेले आहेत. तिसरा सीजन लवकरात लवकर प्रदर्शित करावा अशी मागणी प्रेक्षक सोशल मीडियावर करत होते. त्यामुळेच आता 'स्ट्रगलर साला 3'चा पहिला एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता हा स्ट्रग्लर्सच्या तिसऱ्या सीझनचा वेडेपणासुद्धा प्रेक्षक डोक्यावर घेतात का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
संबंधित बातम्या
Jeevacha Raan In Matdan : राजकारणातील पडद्यामागचे चेहरे दाखवणार 'जीवाचं रान इन मतदान'; विजू मानेंची नवी वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Majha Katta : 'एकदा काय झालं'; सलील कुलकर्णी, सुमीत राघवन सांगणार गोष्टी सांगणाऱ्या माणसाची गोष्ट
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)