Vidyut Jammwal : सरोगसी की मूल दत्तक घेणार? अभिनेता विद्युत जामवाल म्हणाला...
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये विद्युतनं मूल दत्तक घेणे, सरोगसी आणि आयव्हीएफ याबद्दल चर्चा केली.
Vidyut Jammwal : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) हा त्याच्या फिटनेसनं आणि स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. जुलैमध्ये महिन्यामध्ये त्याचा 'खुदा हाफिज चॅप्टर 2 अग्नि परीक्षा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. विद्युत जामवालनं फॅशन डिझाइनर नंदिता महतानीसोबत साखरपुडा केला. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये विद्युतनं मूल दत्तक घेणे, सरोगसी आणि आयव्हीएफ याबद्दल चर्चा केली.
काय म्हणाला विद्युत?
'मी मुलं दत्तक घेऊ शकतो, मी IVF, सरोगसीचा पर्याय देखील निवडू शकतो. मी या गोष्टींसाठी तयार आहे. जर कोणाला मूल हवे असेल तर त्यांनी दुसरा कोणताही विचार न करता त्यासाठी सर्व प्रयत्न करावेत. कारण मूल हे देवानं दिलेलं गिफ्ट आहे. जर त्या मुलाला तुमच्या आयुष्यात यायचा असेल तर ते येईल.', असं विद्युतनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं.
विद्युतचा खुदा हाफिज चॅप्टर 2 अग्नी परीक्षा हा 2020 मध्ये रिलीज झालेल्या खुदा हाफिज या चित्रपटाचा सिक्वेल होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन फारुक कबीर यांनी केले होते. तर कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, स्नेहा बिमल पारेख, राम मिरचंदानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात समीर चौधरी ही भूमिका विद्युतनं साकारली तर त्याच्या पत्नीची भूमिका शिवालिका ओबेरॉयनं साकारली. चित्रपटाची कथानक हे एका जोडप्यावर आणि त्यांच्या दत्तक मुलीवर आधारित आहे. या चित्रपटातील भूमिकेबद्दल विद्युत म्हणाला, 'मला वाटते की मूल गमावण्याच्या भावनिक गोंधळातून मी गेलो. मला वाटते की हा आतापर्यंतचा सर्वात कसोटीचा क्षण असतो. मूल गमावणे हा एक विचार कोणताही पालक हँडल करु शकत नाही, असं मला वाटतं. '
विद्युतनं 2011 मध्ये तिने 'शक्ती' या तेलुगु चित्रपटातून टॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर 2012 मध्ये, तो बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूजासोबत 'फोर्स' चित्रपटात दिसला. ज्यासाठी त्याला सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्युतला साऊथच्या चित्रपटांमधील अभिनयानं विशेष लोकप्रियता मिळाली.
वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: