(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Khuda Haafiz 2 : रिलीज होण्याआधीच 'खुदा हाफिज 2' अडकला वादाच्या भोवऱ्यात; निर्मात्यांना मागावी लागली माफी
खुदा हाफिज 2 (Khuda Haafiz 2) रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात आडकला आहे.
Khuda Haafiz 2 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) त्याच्या फिटनेसनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. त्याचा आगामी चित्रपट खुदा हाफिज 2 (Khuda Haafiz 2) रिलीज होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात आडकला आहे. या चित्रपटातील हक हुसेन या गाण्यावर शिया समुदायानं आक्षेप घेतला आहे. ज्यामुळे आता या चित्रपटाच्या निर्मात्यांना माफी मागावी लागली आहे.
काय आहे प्रकरण?
अभिनेता विद्युत जामवालच्या खुदा हाफिज 2 या चित्रपटामधील हक हुसेन हे गाणं रिलीज झालं आहे. या गाण्यावर शिया समुदायानं आक्षेप घेतला आहे. शिया समुदायाच्या मते, गाण्यात हुसेन शब्दाचा वापर आणि दाखवलेली दृश्ये आक्षेपार्ह आहेत. शिया समुदायानं अक्षेप घेतल्यानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन माफी मागितली आहे. या पोस्टमध्ये निर्मात्यांनी लिहिलं की, 'आमचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. आमच्या चित्रपटातील 'हक हुसेन' या गाण्यामध्ये काही बदल करण्यात येतील. आम्ही गाण्यामध्ये हक हुसेनऐवजी जूनून है या शब्दाचा वापर केला जाईल. तसेच गाण्यामधील ब्लेड आणि मातम जंजीरचे सीन्स देखील बदलण्यात येतील.'
पुढे पोस्टमध्ये चित्रपट निर्मात्यांनी लिहिले की, 'या गाण्याच्या माध्यमातून आम्हाला फक्त इमाम हुसेन यांची गौरव गाथा लोकांसमोर मांडायची होती. आम्हाला कोणाच्याही धार्मिक भावना दुखवायच्या नव्हत्या. चित्रपट रिलीज होण्यापूर्वी गाण्यामध्ये बदल केले जातील.' खुदा हाफिज-2 हा चित्रपट आठ जुलै रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन फारुक कबीर यांनी केलं आहे. तर चित्रपटामध्ये विद्युत जामवालसोबतच शिवालिका ओबेरॉय देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, स्नेहा बिमल पारेख, राम मिरचंदानी यांनी खुदा हाफिज 2 या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
हेही वाचा:
- विद्युत जामवालची कमाल, बर्फाच्या पाण्यात घेतली डुबकी, व्हिडीओ व्हायरल
- विद्युत जामवालच्या 'नादी लागू नका!', 'या' यादीत पुतिन यांच्यासोबत जगात टॉप 10मध्ये