Taapsee Pannu : तापसीचं पहिलं प्रेम; पण या कारणामुळं झालं होतं ब्रेक-अप, शोमध्ये दिली माहिती
Taapsee Pannu : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूच्या अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते.
Taapsee Pannu Relationship News : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूच्या (Taapsee Pannu) अभिनयाला प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. तापसीने बॉलिवूड बरोबरच टॉलिवूडमध्ये देखील तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नाम शबाना, पिंक आणि थप्पड यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये तापसीने काम केले आहे. सध्या तापसीचा एका मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तापसी तिच्या ती 9 वीमध्ये असतानाच्या पहिल्या प्रेमाबद्दल सांगत आहे.
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो द कपिल शर्मा शोमध्ये तापसीने 'मिशन मंगल' या चित्रपटाच्या टिमसोबत हजेरी लावली होती. यावेळी तिच्यासोबत अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा देखील शोमध्ये उपस्थित होते. यावेळी मुलाखतीमध्ये तापसीने सांगितले की,' मी शाळेत 9 वीमध्ये होते आणि माझा बॉयफ्रेंड 10 वीमध्ये होता. 10 च्या बॉर्डच्या परीक्षेकडे त्याला पूर्ण लक्ष द्यायचे होते म्हणून त्याने माझ्यासोबत ब्रेक-अप केले. तेव्हा मी खूप रडले होते.'
View this post on Instagram
Dev Anand: देव आनंद यांना काळा रंगाचा कोट घालण्यास कोर्टानं घातली होती बंदी, कारण ऐकून व्हाल हैराण
तापसी पन्नूने 2012 साली 'चश्मे बद्दूर' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर तिच्या सांड की आंख, बदला, जुडवा 2 आणि बेबी या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. तापसीचा ब्लर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन अजय बहल यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाची निर्मीती आउटसाइडर्स फिल्म्स आणि इकोलोन प्रोडक्शन यांनी केले आहे. तापसीसोबतच अभिनेता गुलशन देवय्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.
Ajunahi Barsaat Aahe : मीरा आणि आदिराज अडकणार लग्नाच्या बेडीत, आजपासून लग्नसोहळ्याला सुरुवात