Suzhal- The Vortex Trailer : 'सुजल-द वोर्टेक्स' 30 पेक्षा अधिक भाषेत होणार प्रदर्शित; ट्रेलर आऊट
Suzhal- The Vortex Trailer : 'सुजल-द वोर्टेक्स' ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
Suzhal- The Vortex Trailer : 'सुजल-द वोर्टेक्स' (Suzhal- The Vortex) ही वेबसीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या वेबसीरिजचा ट्रेलर रिलीज झाला आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर ही वेबसीरिज प्रदर्शित होणार आहे. 'विक्रम वेधा' फेम पुष्कर आणि गायत्रीने या वेबसीरिजचे लेखन आणि निर्मिती केली आहे. ही वेबसीरिज आठ पेक्षा अधिक भाषेत प्रदर्शित होणार आहे.
ऐश्वर्या राजेश, राधाकृष्णन पार्थिबन, काथिर आणि श्रिया रेड्डी 'सुजल-द वोर्टेक्स' या वेबसीरिजमध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ही सीरिज तामिळनाडूतील एका मुलीवर भाष्य करणारी आहे. या वेबसीरिजमध्ये प्रेक्षकांना अनेक ट्विस्ट पाहायला मिळणार आहेत. थरार नाट्य असणाऱ्या या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यामुळे प्रेक्षक आता वेब सीरिजची प्रतीक्षा करत आहेत.
सीरिजमध्ये श्रृंखलाचे पात्र साकारणारे राधाकृष्णन पार्थिबन म्हणाले, "गेल्या अनेक दिवसांपासून या वेबसीरिजवर आम्ही काम करत आहोत. ही सीरिज प्रेक्षकांचे मनोरंजन करेल यात शंका नाही. 40 वर्ष मनोरंजनक्षेत्रात काम केल्यानंतर या सीरिजच्या माध्यमातून ओटीटी विश्वात पदार्पण करत आहे".
'सुजल-द वोर्टेक्स' या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटी विश्वात पदार्पण करणारी ऐश्वर्या राजेश म्हणाली, 'सुजल-द वोर्टेक्स' ही सीरिज एका छोट्या शहरातील समस्यांवर भाष्य करणारी आहे. ही सीरिज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. 17 जूनला ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कोणत्या भाषेत होणार रिलीज?
'सुजल-द वोर्टेक्स' ही वेबसीरिज 17 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 30 पेक्षा अधिक भाषेत ही सीरिज प्रदर्शित होणार आहे. यात तामिळ, हिंदी, कन्नड, मल्याळम, तेलुगू, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, इतालवी, जपानी, पोलिश, पोर्तुगी, कॅस्टिलिअन स्पॅनिश, लॅटिन स्पॅनिश, अरबी, तुर्कीसह 30 भाषेंचा समावेश आहे.
संबंधित बातम्या